Virat Kohli खरंच आजारी आहे का? पत्नी अनुष्काची ती पोस्ट खरी की खोटी?

भारतीय क्रिकेटर विराट कोहलीने (Virat Kohli) आपला शतकांचा दुष्काळ अखेर संपवला आहे. ऑस्ट्रेलियाविरोधातील चौथ्या कसोटी सामन्यात (Ind Vs Aus 4th Test) विराट कोहलीने शतक (Century) ठोकलं आहे.

Updated: Mar 12, 2023, 08:59 PM IST
Virat Kohli खरंच आजारी आहे का? पत्नी अनुष्काची ती पोस्ट खरी की खोटी? title=

Anushka Sharma On Virat Kohli Century : भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind VS Aus) यांच्यामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळवण्यात येतेय. या सामन्याच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाचा फलंदाज विराट कोहलीने तुफान फलंदाजी केली. विराटने ऑस्ट्रेलियाविरूद्ध 364 बॉल्समध्ये 186 रन्सची खेळी केली. त्याच्या या उत्तम खेळीनंतर त्याची पत्नी आणि अभिनत्री अनुष्का शर्माने खास ट्विट केलंय. तिच्या या पोस्टनुसार, विराट कोहलीने आजारी असून शतक झळकावलं आहे.

कोहलीने झळकावलं शतक

भारतीय क्रिकेटर विराट कोहलीने (Virat Kohli) आपला शतकांचा दुष्काळ अखेर संपवला आहे. ऑस्ट्रेलियाविरोधातील चौथ्या कसोटी सामन्यात (Ind Vs Aus 4th Test) विराट कोहलीने शतक (Century) ठोकलं आहे. तब्बल तीन वर्षांनी विराट कोहलीने शतक केलं आहे. विराट कोहलीचं कसोटी करिअरमधील हे 28 वं शतक आहे. यानिमित्ताने विराटने टी-20, वन-डे नंतर आता कसोटी मालिकेतील शतकांची प्रतिक्षा अखेर संपवली आहे. 

अनुष्का शर्माची खास पोस्ट

कठीण परिस्थितीत देखील अनेकदा विराट कोहली चांगला खेळ करतो, अशी त्याची ख्याती आहे. अशातच आता, त्याची पत्नी अनुष्काने कोहलीच्या 75 व्या इंटरनॅशनल शतकानंतर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओसोबत तिने लिहिलंय की, आजारी असून देखील तू इतका चांगला खेळलास, तू मला नेहमीच प्रेरीत करतोस.

दरम्यान सामन्यानंतर जेव्हा अक्षर पटेलला कोहलीच्या आजाराबद्दल विचारण्यात आलं, त्यावेळी पटेल म्हणाला, तो आजारी आहे याबद्दल मला माहिती नाही. ज्या पद्धतीने तो रन्ससाठी धावत होता, त्यावरून तरी तो आजारी वाटला नाही. 

चौथ्या टेस्टमध्ये टीम इंडिया मजबूत स्थितीत

बॉर्डर गावस्कर सिरीजच्या चौथ्या सामन्याच चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने 571 धावा केल्या. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या टीमने दुसऱ्या डावात एकंही विकेट न गमावता 3 रन्स केले. यावेळी पहिल्या डावात कोहलीने 1205 दिवसांच्या मोठ्या कालावधीनंतर टेस्ट सामन्यामध्ये शतक झळकावलं.

पहिल्या डावात विराट कोहली मैदानावर आला तेव्हा भारतीय संघाची धावसंख्या 187 वर दोन गडी बाद अशी होती. कोहली मैदानावर लयीत दिसत होता. तिसऱ्या दिवशी त्याने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. कोहली चौथ्या दिवशी पुन्हा मैदानावर उतरला तेव्हा 59 धावांवर नाबाद होता. दरम्यान कोहलीने 44 धावा केल्या तेव्हा घऱच्या मैदानावर 4000 धावांचा टप्पा गाठला. तसंच घरच्या मैदानावरील हे 14 वं शतक आहे. कोहलीने कसोटीतील शतकांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा हाशीम आमला आणि ऑस्ट्रेलियाच्या मायकल क्लार्कची बरोबरी केली आहे.