Cricket Viral Video: तुम्ही क्रिकेटचे फार मोठे चाहते आहात का? क्रिकेटसंदर्भातील सर्व अपडेट्स तुमच्याकडे असतात? एकही सामना तुम्ही पाहायचा सोडत नाही वगैरे प्रकारचं तुमचं क्रिकेटचं प्रेम असलं तरी आज आपण इथं ज्या फिल्डींग सेटअप बद्दल बोलणार आहोत ती तुम्ही कदाचितच पाहिली असेल. सध्या या अनोख्या फिल्डींग सेटअपची म्हणजेच मैदानावरील खेळाडूंच्या व्यूहरचनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
खरं तर सध्या भारतामध्ये सध्या इंडियन प्रिमिअर लीगची धूम असतानाच इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेटच्या 2024 च्या पर्वासाठी संघ जोरदार तयारी करत आहेत. येथील स्थानिक संघ सध्या सराव सामन्यांमध्ये कसून मेहनत करत आहेत. नुकताच समरसेट विरुद्ध एक्सेटर युनिव्हर्सिटीदरम्यानचा सराव सामना पार पडला. या सामन्यामध्ये विरोधी संघातील फलंदाजांच्या फटकेबाजीवर लगाम घालण्यासाठी समरसेटच्या संघाने अगदीच भन्नाट फिल्डींग लावली होती. 3 दिवसांच्या या सामन्यातील शेवटच्या सत्रामधील खेळ बुधवारी खळवण्यात आला. यावेळेस एक्सेटरचा संघ त्यांच्या दुसऱ्या डावात फलंदाजी करत होता. शेवटचं सत्र असल्याने समरसेटचा कर्णधार लुविस जॉर्गरी थोडे प्रयोग करण्याच्या विचारात होता. अचानक त्याने मैदानात अशी काही फिल्डींग लावली की जी फारच क्वचित पाहायला मिळते. उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाच्या अगदी समोर नॉन स्ट्राइकर एण्डच्या फलंदाजाच्या बाजूलाच 3 खेळाडूंना उभं करण्यात आलं होतं. सामान्यपणे फलंदाजाच्या मागे विकेटकीपरच्या बाजूला ज्या पद्धतीने स्लीपमध्ये फिल्डींग लावली जाते तशीच फिल्डींग फलंदाजाच्या समोरील बाजूस लावण्यात आली होती.
फलंदाजाच्या अगदी समोर उभ्या केलेल्या या खेळाडूंपैकी एकजण फाइन मिड-ऑफला उभा होता. दुसरा फाइन शॉर्ट कव्हरला आणि इतर दोघे ऑफ साईडला बॉल जाणार नाही अशापद्धतीने उभे होते. यामुळे स्लीपमध्ये लावल्या जाणाऱ्या फिल्डींगच्या अगदी उलट हा सेटअप होता. फलंदाजाने ऑफ ड्राइव्ह मारु नये म्हणून अशी फिल्डींग लावण्यात आली होती. कर्णधाराने गली पोझिशनला ही एक फिल्डर ठेवला होता. तसेच फर्स्ट स्लीपला थोडा बाहरेच्या बाजूस एका फिल्डर उभा करण्यात आला होता.
नक्की वाचा >> 'रोहित कॅप्टन असताना मुंबई सलग 5 मॅच हरल्यानंतर...'; हार्दिकची बाजू घेत सेहवाग स्पष्टच बोलला
समरसेट क्रिकेटच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 'तुम्ही कधी अशी फिल्डींग पाहिली आहे का?' अशा कॅप्शनसहीत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.
Ever seen a field like this before?....#WeAreSomerset pic.twitter.com/XFy0cnOx2f
— Somerset Cricket (@SomersetCCC) April 3, 2024
बरं ही अशी फिल्डींग लावल्याचा फायदाही झाला. एकदा चेंडू अगदी उजवीकडे असलेल्या खेळाडूपासून काही अंतरावर पडला. फलंदाज थोडक्यात बचावला. मात्र त्यानंतर त्याने या बाजूला फटके मारण्याची फारशी हिंमत केली नाही आणि ऑफ साईडला होणारे बऱ्याच धावा समरसेटच्या संघाला रोखता आल्या. हा सामना अनिर्णित राहिला.
नक्की वाचा >> 29 बॉलमध्ये 61 धावा करुन सामना जिंकवणाऱ्या 'शशांक सिंह'मुळे प्रीती झिंटाला झालेला पश्चाताप, पण...
आजपासून म्हणजेच 5 एप्रिलपासून कौंटी क्रिकेटला सुरुवात होत असून समरसेटचा संघ केंटच्या संघाविरुद्ध पहिल्या सामन्यात मैदानात उतरणार आहे.