लंडन : इंग्लंडने एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम केलाय. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ५० षटकांत ४८१ धावांचा डोंगर उभारला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आणि स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला. इंग्लंडनं सुरुवातीपासूनच कांगारु गोलंदाजांची धुलाई केली. जेसन रॉय आणि बेस्टोह यांनी १५९ धावांची दमदार सलामी दिली. रॉय बाद झाल्यावर अॅलेक्स हेल्सनं ९२ चेंडूत १४७ धावांची तुफानी खेळी केली. ९२ चेंडूत १३९ धावांची धडाकेबाज खेळी करणाऱ्या बेस्टोची साथ लाभली. या दोघांच्या खेळीमुळेच इंग्लंडला ५० षटकांत ४८१ धावांचा डोंगर उभारता आला. इंग्लंडने अशाप्रकारे तुफानी खेळी करत एकदिवसीय क्रिकेटमध्ये नवा विक्रम रचला आहे.