ENG vs PAK : मार्क वूडच्या खतरनाक बाऊन्सरसमोर पाकिस्तानचा पैलवान चारीमुंड्या चीत, पाहा Video

Mark Wood Bouncer To Azam Khan : पाकिस्तानसाठी आता वर्ल्ड कपमध्ये लाज राखणं हेच खरं आव्हान असणार आहे. इंग्लंडच्या घातक गोलंदाजासमोर (ENG vs PAK) पाकिस्तानच्या पैलवानाची काय परिस्थिती झाली? पाहा व्हिडीओ

सौरभ तळेकर | Updated: May 31, 2024, 04:59 PM IST
ENG vs PAK : मार्क वूडच्या खतरनाक बाऊन्सरसमोर पाकिस्तानचा पैलवान चारीमुंड्या चीत, पाहा Video title=
ENG vs PAK Mark Wood Bouncer To Azam Khan

England vs Pakistan : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या तोंडावर पाकिस्तानला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलंय. सध्या पाकिस्तान आणि इंग्लंड (ENG vs PAK) यांच्यात टी-ट्वेंटी मालिका खेळवण्यात आली होती. या  मालिकेत पाकिस्तानला एकही सामना जिंकता आला नाही. इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध 2-0 ने मोठा विजय मिळवला अन् सिरीज खिशात घातली. 4 सामन्यांच्या मालिकेतील केवळ 2 सामने खेळवले गेले होते, पावसाच्या व्यत्ययामुळे दोन सामने रद्द करावे लागले होते. गेल्या तीन वर्षात पाकिस्तान क्रिकेट संघाला एकही मालिका जिंकता आली नाही. त्यामुळे आता पाकिस्तान वर्ल्ड कप (T20 World Cup 2024) जिंकणार तरी कसा? असा प्रश्न पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाला पडलाय. 

इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात विजय मिळवून लाज राखण्याचं आव्हान पाकिस्तानसमोर होतं. पण पुन्हा पाकिस्तानी खेळाडूंनी माती खालली. या सामन्यादरम्यान इंग्लिश वेगवान गोलंदाज मार्क वूडने इतका धारदार बाऊन्सर (Mark Wood Bouncer To Azam Khan) टाकला की पाकिस्तानी फलंदाज आझम खान चारीमुंड्या चीत झाला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर टेंड्र होतोय. या सामन्यात पाकिस्तानला 7 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. 

पाहा Video

दरम्यान, पाकिस्तानचा संघ जर यंदा टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला तर प्रत्येक खेळाडूला 1,00,000 डॉलर म्हणजेच 2.77 कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात येईल, असं गरिबीत असलेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनी म्हटलं आहे.  पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बाबर आझम (Babar Azam) याच्या खांद्यावर पुन्हा संघाची जबाबदारी दिली. तर इमाद वसिम (Imad Wasim) आणि मोहम्मद आमिर यांना पुन्हा संघात स्थान दिलं आहे.

वर्ल्ड कपसाठी इंग्लंडचा संघ - जॉस बटलर (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम कुरन, बेन डकेट, टॉम हार्टले, विल जॅक्स, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, फिल सॉल्ट, रीस टोपली, मार्क वुड.

वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ - बाबर आझम (कर्णधार), अबरार अहमद, आझम खान, फखर जमान, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद अमीर, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सॅम अयुब, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान शाह माजे.