एजबस्टन : उपकर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि ऑलराऊंडर रवींद्र जाडेजाच्या (Ravindra Jadeja) शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने इंग्लंड विरुद्धच्या (England vs India) पाचव्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात 416 धावा केल्या आहेत. पंतने 146 धावा केल्या. तर जाडेजाने 104 रन्सचं योगदान दिलं. तर शेवटी शेवटी कॅप्टन जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या (Stuart Broad) बॉलिंगवर एकाच ओव्हरमध्ये 35 धावा कुटल्या. (eng vs ind 5th Rescheduled match stuart broad bowled most expensive over in test cricket jasprit bumrah hit 35 runs)
जसप्रीत बुमराह कसोटीमध्ये एका ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा ठोकणारा फलंदाज ठरला. यासह बुमराहने वर्ल्ड रेकॉर्ड केला. तसेच ब्रॉड कसोटीत क्रिकेटच्या इतिहासात एका ओव्हरमध्ये सर्वाधिक रन्स लुटवणारा गोलंदाज ठरला. ब्रॉडने या ओव्हरमध्ये एकूण 8 बॉल टाकले. ब्रॉडने नो आणि वाईड बॉल टाकल्याने त्याला 2 अतिरिक्त बॉल फेकावे लागले.
पहिला बॉल : फोर
दुसरा बॉल : फोर + वाईड
तिसरा बॉल : सिक्स + नो बॉल
चौथा बॉल : फोर
पाचवा बॉल : फोर
सहावा बॉल : फोर
सातवा बॉल : सिक्स
आठवा बॉल : 1 रन
बुमराहच्या या खेळीमुळे क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा युवराज सिंहची 2007 च्या टी 20 वर्ल्ड कपमधील खेळी आठवली. युवराजने 2007 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये स्टुअर्ट ब्रॉडच्याच ओव्हरमध्ये सहा सिक्स लगावले होते. आता बुमराहच्या या फटकेहबाजीमुळे चाहत्यांना पुन्हा युवराजची आठवण झालीय.
दरम्यान बुमराहने या विश्व विक्रमी खेळीत 16 बॉलमध्ये नाबाद 31 धावांची खेळी साकारली. यामध्ये त्याने 4 कडकडीत फोर आणि 2 खणखणीत सिक्स झोडले.
Stuart Broad to @Jaspritbumrah93 the batter
An over to remember! A record shattering over! #ENGvIND pic.twitter.com/l9l7lslhUh
— BCCI (@BCCI) July 2, 2022
जसप्रीत बुमराहचा वर्ल्ड रेकॉर्ड
World record alert: 35 runs in a single over - Bumrah is the hero. pic.twitter.com/B43Ic5T9mD
— Johns. (@CricCrazyJohns) July 2, 2022