ठरलं! विराट कोहलीच्या जागी सूर्यकुमार यादव खेळणार?

पहिल्या वन डे सामन्यात रोहितसोबत ओपनिंगला कोण उतरणार? पाहा संभाव्य Playing XI

Updated: Jul 12, 2022, 11:04 AM IST
ठरलं! विराट कोहलीच्या जागी सूर्यकुमार यादव खेळणार? title=

मुंबई : टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर आहे. पाचवा कसोटी सामना गमवला पण टी 20 सीरिज 2-1 ने जिंकली. आता 3 सामन्यांची वन डे सीरिज आजपासून खेळवण्यात येणार आहे. या सीरिजआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. विराट कोहलीला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो वन डे सीरिज खेळू शकणार नाही. पहिल्या सामन्यातून तो बाहेर झाला आहे. 

कोहलीच्या जागी कोण कोणाला संधी मिळणार याची चर्चा सुरू आहे. आता संभाव्य प्लेइंग इलेव्हन समोर आलं आहे. वन डे सामन्यात सूर्यकुमार यादव आणि शिखर धवन खेळताना दिसू शकतात. सूर्यकुमार यादवला संधी देण्यात आली आहे. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिखर धवन रोहितसोबत ओपनिंग करेल. तिसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव विराट कोहलीच्या जागी उतरेल. तर श्रेयस अय्यर पाचव्या क्रमांकावर उतरणार आहे. रिषभ पंत फिनिशरच्या भूमिका निभावणार असल्याचं सध्या समोर आलं आहे. 

बॉलर्समध्ये युजवेंद्र चहलकडे मोठी जबाबदारी असेल. हार्दिक पांड्या आणि जडेजा ऑलराउंडर असल्याने दोन्हीकडे त्यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद शमी मैदानात खेळताना दिसणार आहेत. मोहम्मद सिराज आणि शार्दूल ठाकूरला संधी देण्यात आली नाही.