ENG vs AUS: स्टीव स्मिथ Out की Not Out? बेन स्टोक्सचा वादग्रस्त कॅच; Video पाहून तुम्हीच ठरवा!

Ben Stokes controversial Catch Video: झालं असं की... मोईन अलीचा बॉल स्मिथने (Steve Smith) प्लेस करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बॉलने उसळी घेतली अन् बॉल थेट बेन स्टोक्सच्या दिशेने गेला. तेवढ्यात..

Updated: Aug 1, 2023, 07:51 AM IST
ENG vs AUS: स्टीव स्मिथ Out की Not Out? बेन स्टोक्सचा वादग्रस्त कॅच; Video पाहून तुम्हीच ठरवा! title=
controvery Over Ben Stokes catch

Steve Smith, ENG vs AUS: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (England vs Australia) यांच्या निर्णायक असा पाचवा कसोटी सामना खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडने 49 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्याचबरोबर आता अॅशेस सिरीज 2-2 अशी ड्रॉ झाली आहे. त्यामुळे आता निवृत्ती जाहीर केलेल्या स्टुअर्ड बॉडचा (Stuart Broad) शेवट गोड झालाय. मात्र, पाचवा सामना चर्चेत राहिला तो एका वादग्रस्त कॅचमुळे. स्टीव स्मिथ (Steve Smith) फलंदाजी करत असताना बेन स्टोक्सने (Ben Stokes catch) एक चूक केली. त्याला फटका इंग्लंडच्या संघाला बसला.

बेन स्टोक्सची एक चूक

झालं असं की... पाचव्या सामन्याच्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचे 65 धावांवर होता. त्यावेळी स्टिव स्मिथ मैदानात पाय रोखून उभा होता. संघाला विजयासाठी 384 धावांची गरज होती. मोईन अली गोलंदाजी करत असताना ऑस्ट्रेलियाची तारंबळ उडाली होती. मोईन अलीचा बॉल स्मिथने प्लेस करण्याचा प्रयत्न केला.  त्यावेळी बॉलने उसळी घेतली अन् बॉल थेट बेन स्टोक्सच्या दिशेने गेला. स्टोक्सने उडी घेत एका हातात कॅच घेतला मात्र, तिथंच एक चुक झाली.

कॅच घेत असताना स्टोक्सच्या हातातून बॉल निसटला. फक्त तीन सेकंद त्याच्या हातात बॉल राहिला होता. त्यानंतर बॉल खाली पडला. कॅच घेतला गेला असं सर्वांना वाटलं मात्र बॉल सुटला होता. इंग्लंडच्या प्लेयर्सने जल्लोष केला. मात्र, अंपायरने नॉट आऊट जाहीर केलं. त्यानंतर स्टोक्सने रिव्ह्यु घेतला. मात्र, तो देखील फेल गेला.

पाहा Video

कशी होती अॅशेस मालिका?

इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यांत पहिला सामना हा बर्मिंगघम इथे खेळवण्यात आला. हा सामना ऑस्ट्रेलियाने 2 विकेट्सने जिंकत विजयी सलामी दिली. ऑस्ट्रेलियाने या विजयासह 1-0 ने आघाडी घेतली होती. त्यानंतर लॉर्डस क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला धुळ चारली आणि 2-0 ने आघाडी घेतली होती. तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने जोरदार कमबॅक केलं अन् तिसरा सामना जिंकला. त्यामुळे मालिकेतील चुरस आणखी वाढली होती. मात्र, चौथ्या सामन्याच्या पाचव्या दिवशी इंग्लंडच्या स्वप्नाची 'राख' झाली. त्यानंतर पाचव्या सामन्यात इंग्लंडने पुन्हा बाजी मारली.