श्रीलंकेत आणीबाणी पण क्रिकेट चाहत्यांसाठी खूशखबर

भारत आणि श्रीलंका यांच्यात आज ७ वाजता तिरंगी सिरीजचा पहिला सामना रंगणार आहे. पण यातच श्रीलंकेत आणीबाणीची घोषणा झाली.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Mar 6, 2018, 03:55 PM IST
श्रीलंकेत आणीबाणी पण क्रिकेट चाहत्यांसाठी खूशखबर title=

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यात आज ७ वाजता तिरंगी सिरीजचा पहिला सामना रंगणार आहे. पण यातच श्रीलंकेत आणीबाणीची घोषणा झाली.

काही हिंसात्मक घटनांमुळे तेथे आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे. पण भारतीय टीम कोलंबोमध्ये होणारा सामना खेळणार आहे. बीसीसीआयने म्हटलं की, ही आणीबाणी फक्त कँडी शहरामध्ये आहे. आजचा सामना मात्र कोलंबोमध्ये होणार आहे.

बीसीसीआने म्हटलं की, 'सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत बोलणं झाल्यानंतर परिस्थिती सामान्य असल्याचं कळतं आहे. त्यामुळे सामना होणार आहे.'