भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांसंदर्भात परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान, म्हणाले...

India vs Pakistan Match : परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी भारत-पाकिस्तान (IND vs PAK) क्रिकेट सामन्यांमधून दोन्ही देशांचे संबंध सुधारतील का यासंदर्भातही भाष्य केलं.  

Updated: Dec 10, 2022, 11:43 AM IST
भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांसंदर्भात परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान, म्हणाले... title=
EAM Jaishankar opens up on future of IND vs PAK matches

India vs Pakistan : भारत-पाकिस्तान (IND vs PAK) या संघात जेव्हा जेव्हा सामना होतो तेव्हा संपूर्ण जगाची नजर या दोन संघांवर असते.  या दोन्ही देशांदरम्यान यापूर्वी अनेक रोमांचक सामने झाले आहेत, जे आजही चाहत्यांच्या स्मरणात आहेत. एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध भारताचा विक्रम चांगला असला तरी 36 वर्षांपूर्वी पाकिस्तानने भारतावर जो घाव घातला होता, त्यामुळे पूर्ण देशाची झोप उडाली होती. याचपार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री जयशंकर (Minister Jaishankar) यांनी मोठं विधान केले आहे. 

भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan Match) संबंधांबद्दल परराष्ट्रमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी, जयशंकर यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांमधून दोन्ही देशांचे संबंध सुधारतील का यासंदर्भातही भाष्य केलं.

“जर तुमचे शेजारी खुलेपणे दहशतवाला पाठिंबा देत असतील तर तुम्ही त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी जाल का? दहशतवादी तळांवर ते कशापद्धतीने कारवाई करतात याकडे लक्ष्य ठेवण्याचं आपलं काम आहे. भारत आणि पाकिस्तान सीमेवर सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. पण ते दहशतवादाचा मार्ग सोडतील अशी आमची अपेक्षा आहे,” असंही एस. जयशंकर  (Minister Jaishankar)  यांनी म्हटलं आहे. 

वाचा : आई-वडील, लहान भाऊ आणि मित्रांना भेटण्यास आफताबचा नकार 

क्रिकेटसंदर्भातील (cricket news) आपली भूमिका तुम्हाला ठाऊक आहे. एखादा देश दहशतवादाला पाठिंबा देतोय आहे हे आपण कधीच स्वीकारता कामा नये. आपण जोपर्यंत याचा विरोध करत नाही तोपर्यंत हे असंच सुरु राहील. त्यामुळेच पाकिस्तानवर जागतिक स्तरावरील दबाव निर्माण करणं गरजेचं आहे. दहशतवाला बळी पडलेले (देश) जोपर्यंत समोर येऊन यासंदर्भात उघड भूमिका घेत नाहीत तोपर्यंत हा दबाव निर्माण होणार नाही. यामध्ये भारताने पुढाकार घ्यायला हवा कारण यासाठी आपण रक्त सांडलं आहे,” असं एस. जयशंकर यांनी सांगितलं.