मॅचआधी व्हिडीओ पाहतो का?, स्वत: विराटने केला मोठा खुलासा!

किंग विराट कोहलीचा मोठा खुलासा, म्हणाला...

Updated: Oct 30, 2022, 12:32 AM IST
मॅचआधी व्हिडीओ पाहतो का?, स्वत: विराटने केला मोठा खुलासा! title=

Sport News : किंग विराट कोहली टी-20 वर्ल्ड कपसारख्या महत्त्वाच्या टूर्नामेंटमध्ये फॉर्ममध्ये आला आहे. कोहलीने पाकिस्तान आणि नेदरलँडविरूद्धच्या सामन्यामध्ये दमदार अर्धशतक मारत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. आता रविवारी दक्षिण आफ्रिकेविरूद्ध भारताची मॅच आहे. त्याआधी कोहली त्याची तयारी कशी करतो, जुने व्हिडीओ पाहतो का? याबाबत विराट कोहलीने स्वत: खुलासा केला आहे.

मैदानावर जाण्यापूर्वी मी कोणताही व्हिडीओ पाहत नाही. मी थेट नेटमध्ये जाऊन गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीचे काही चेंडू समजून घेण्यात तुम्ही चुका कराल पण ते नैसर्गिक आहे. तुम्हाला खेळपट्टीचा अंदाज आणि बॉलचा किती उसळी घेत आहे हे लक्षात आल्यावर तुम्हाला माहितच आहे बॅटींग कशा पद्धतीने करायची, असं विराट कोहली म्हणाला. 

ज्या खेळाडूला वेगवान माऱ्याची सवय असेल तर त्याला ऑस्ट्रेलियाची खेळपट्टी फलंदाजीसाठी सर्वोत्तम आहे. तुम्ही टूर्नामेंटसाठी भारतातून तयार होऊन येऊ शकत नाही. तुम्ही इथली परिस्थिती जाणून घ्या आणि मग स्वतःला इथल्या वातावरणाशी जुळवून घ्या. वेगवान माऱ्याची आवड असेल तर ऑस्ट्रेलियापेक्षा चांगलं विकेट नसल्याचं विराट कोहलीने म्हटलं आहे. स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत तो बोलत होता.

कोहलीची ऑस्ट्रेलियामधील आकडेवारी पाहिली तर लक्षात येईल कोहलीला इथल्या मैदानांवर खेळायला का आवडतं. कारण कोहलीने ऑस्ट्रेलियाविरूद्ध विराटने 55 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 66 डावांमध्ये 56.44 च्या सरासरीने एकूण 3,274 धावा केल्या आहेत. यामध्ये 11 शतके आणि 17 अर्धशतके झळकावली आहेत. महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनंतर कोहली ऑस्ट्रेलियामध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू आहे.