मुंबई : टीम इंडियाने शुक्रवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेची विजयाने सुरुवात केली. भारतीय क्रिकेट टीमने 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात कॅरेबियन टीमचा 68 रन्सचा मोठ्या फरकाने पराभव केला. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीमचं क्रिकेट विश्वात कौतुक होतं. मात्र याच दरम्यान भारताचा माजी सलामीवीर आणि कर्णधाराने विद्यमान मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.
राहुल द्रविडच्या निर्णयावर माजी खेळाडू कृष्णमाचारी श्रीकांत यांनी नाराजी व्यक्त केलीये. त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या T-20 सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये टीम व्यवस्थापनाचा वेगळा विचार केला आणि सांगितलं की, या सामन्यात श्रेयस अय्यरच्या जागी दीपक हुडाला संधी द्यावी.
ते म्हणाले, दीपक हुडा कुठे आहे? त्याने टी-20मध्ये चांगली कामगिरी केली आहे. तसंच एकदिवसीयमध्येही चांगली कामगिरी केली आहे. दीपक टीममध्ये असायला हवा होता. तुम्हाला हे समजलं पाहिजे की, T20 मध्ये तुम्हाला ऑलराउंडर, फलंदाजी ऑलराउंडर, गोलंदाजी ऑलराउंडर खेळाडूंची गरज आहे. त्यामुळे तुमच्याकडे जितके अधिक ऑलराउंडर असतील तितके चांगले."
माजी स्पिनर गोलंदाज प्रज्ञान ओझा याने श्रीकांत यांच्याशी या मुद्यावर चर्चा केली. त्याने राहुल द्रविडचा बचाव करताना सांगितलं की, कोचंच असं मत आहे की, जो खेळाडू चांगली कामगिरी करतो त्याला आधी संधी दिली पाहिजे आणि नंतर दुसरा पर्याय शोधावा.
यावर संतापून श्रीकांत म्हणाले, ''आम्हाला राहुल द्रविडचं मत नको आहे. तुमचे विचार हवेत. आत्ताच द्या."
यावर प्रज्ञान म्हणाला, “हुडा असावा. साहजिकच" यानंतर श्रीकांत म्हणाले, "मग आता संपलं."