कार्तिकनं दाखवली धोनीसारखी चपळता

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मंगळवारी झालेल्या सराव सामन्यामध्ये भारतानं बांग्लादेशला २४० रन्सनं हरवलं.

Updated: May 31, 2017, 04:33 PM IST
कार्तिकनं दाखवली धोनीसारखी चपळता title=

लंडन : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मंगळवारी झालेल्या सराव सामन्यामध्ये भारतानं बांग्लादेशला २४० रन्सनं हरवलं. या मॅचमध्ये दिनेश कार्तिकच्या ९४ आणि हार्दिक पांड्याच्या नाबाद ८० रन्समुळे भारताला ३२४ रन्सपर्यंत मजल मारता आली. रन्सनचा डोंगर उभारल्यानंतर भारतीय बॉलर्सनीही उल्लेखनीय कामगिरी करत बांग्लादेशचा ८४ रन्सवर धुव्वा उडवला. उमेश यादव आणि भुवनेश्वर कुमारनं प्रत्येकी तीन विकेट घेतल्या.

या मॅचमध्ये धोनी आणि कोहलीनं बॅटिंग केली नाही. धोनीनं किपींग न करता फिल्डिंग करणंच पसंत केलं. यामुळे कार्तिकनं किपींग केली. कार्तिकनंही मग विकेटच्या मागे धोनीसारखीच चपळता दाखवत बांग्लादेशच्या महमदुल्लाचा एका हातामध्ये कॅच घेतला.