भारीच! दिनेश कार्तिकने मोडला MS Dhoni चा रेकॉर्ड

T20 मध्ये असं करणारा दिनेश कार्तिक ठरला पहिला खेळाडू, मोडला MS Dhoni चा खास रेकॉर्ड

Updated: Jun 18, 2022, 06:06 PM IST
भारीच! दिनेश कार्तिकने मोडला MS Dhoni चा रेकॉर्ड title=

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या टी 20 सीरिजमध्ये टीम इंडियाने बरोबरीत सीरिज काढली. आता शेवटचा सामना कोण जिंकणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेनं प्रत्येकी दोन सामने जिंकले आहेत. आता शेवटच्या सामन्यावर सर्वांचं लक्ष आहे. 

या सीरिजमधील चौथ्या सामन्यानंतर दिनेश कार्तिकचं कौतुक होत आहे. त्याने महेंद्रसिंह धोनीचा रेकॉर्ड मोडला आहे. त्यामुळे त्याची चर्चा सगळीकडे होत आहे. दिनेश कार्तिक टी 20 मध्ये असा विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. 

दिनेश कार्तिकने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चौथ्या सामन्यात 27 बॉलमध्ये 55 धावा केल्या. यामध्ये 9 चौकार आणि 2 लांब षटकार ठोकले. त्याने मैदानात प्रत्येक ठिकाणी स्ट्रोक मारले. दिनेश कार्तिकने टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6 व्या किंवा त्याहीपेक्षा खालच्या क्रमांकावर खेळून सर्वात जास्त धावा केल्या आहे. त्याच्या नावावर मोठी धावसंख्या केल्याचा विक्रम नोंदवण्यात आला आहे. 

खालच्या फळीमध्ये सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम दिनेश कार्तिकने केला आहे. धोनीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2018 मध्ये 6 व्या क्रमांकावर खेळताना 52 धावा केल्या होत्या. त्याचा हा विक्रम दिनेश कार्तिकने मोडला आहे. 

दिनेश कार्तिकने आपल्या करिअरची सुरुवात 2006 मध्ये केली. त्यावेळी त्याने 31 धावांची खेळी केली होती. 2018 मध्ये बांग्लादेश विरुद्ध त्याने 29 धावा केल्या होत्या. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अर्धशतक ठोकलं आहे. त्याने आपल्या करिअरमध्ये टी 20 क्रिकेटमधील पहिलं अर्धशतक ठोकलं. दिनेश कार्तिकचा आयपीएलमध्ये शानदार फॉर्म पाहायला मिळाला होता.