पहिल्याच सामन्यात पहिल्या बॉलवर खेळाडूच्या नावे अनोखा रेकॉर्ड

न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात काहीतरी असे घडले जे कदाचित कधीच पाहायला मिळाले नसेल. 

Updated: Dec 2, 2017, 02:42 PM IST
पहिल्याच सामन्यात पहिल्या बॉलवर खेळाडूच्या नावे अनोखा रेकॉर्ड title=

नवी दिल्ली : न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात काहीतरी असे घडले जे कदाचित कधीच पाहायला मिळाले नसेल. 

अनोखा रेकॉर्ड

या सामन्यात नील वॅग्नरने वेस्ट इंडिजची हालत खराब करुन ठेवली होती. अशातच चौथी विकेट पडल्यानंतर या टेस्टमधून डेब्यू करणारा सुनील अम्ब्रिस मैदानावर आला. वेस्टइंडिजच्या टीमला त्याचापासून खूप अपेक्षा होत्या पण पहिल्याच बॉलवर तो आऊट झाला. क्रिकेट इतिहासातील ही एक अशी घटना आहे जेव्हा पहिल्यांदाच डेब्य़ू करणारा खेळाडू पहिल्या मॅचमध्ये पहिल्याच बॉलवर हिट विकेट झाला. 

हा रेकॉर्ड तुटणं कठीण

सुनील अम्ब्रिसचा हा असा रेकॉर्ड बनल्यानंतर वॅग्नरला आणखी एक विकेट मिळाली. हा रेकॉर्ड कदाचित तुटणार नाही. कारण जेव्हा आपल्या पहिल्य़ा सामन्यात एखादा खेळाडू जर नो किंवा व्हाईट बॉलवर हिटविकेट होतो तरच हा रेकॉर्ड तुटू शकतो. 

वेस्टइंडिजचा धुव्वा

नील वेग्नरने त्याच्या कारकीर्दत सर्वोत्तम ७ विकेट घेतल्या आहेत. मुळचा दक्षिण आफ्रिकेचा असलेल्या वेग्नरने पहिल्या डावात ३ रन देत ७ विकेट घेतल्या. वेस्ट इंडिजची टीम 45.4 षटकात 134 धावांवर बाद झाली. न्यूझीलंडने दोन विकेट गमवत 85 धावा केल्या आहेत. रावल 29 आणि रॉस टेलर 12 धावांवर खेळत आहेत.