युजवेंद्र चहलला पाहून धोनी असा पळाला... व्हिडिओ व्हायरल

चहलला पाहून धोनी असा धावला....

Updated: Feb 4, 2019, 04:47 PM IST
युजवेंद्र चहलला पाहून धोनी असा पळाला... व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या शेवटच्या वनडेत भारताने 35 रनने विजय मिळवला. ही सिरीज भारताने 4-1 ने जिंकली. 10 वर्षानंतर न्यूझीलंडमध्ये भारताने टीम जिंकली. या सामन्यानंतर युजवेंद्र चहल खेळाडूंची मुलाखत घेतो. काही दिवसांपासून चहलला शो 'चहल टीव्ही' खूप प्रसिद्ध झाला आहे. याधी त्याने विराट कोहली आणि रोहित शर्माची देखील मुलाखत घेतली आहे. चहल या मुलाखतीदरम्यान खेळाडूंची चांगलीच खिल्ली उडवतो.

शेवटचा सामना झाल्यानंतर चहल धोनीची मुलाखत घेऊ इच्छित होता. धोनीला जेव्हा कळालं की चहल त्याच्याकडेच येतो आहे. हे पाहून धोनी तेथून पळाला. चहल देखील त्याच्या मागे धावला. पण धोनी मैदान सोडून आता चालला गेला. धोनीला चहलच्या प्रश्नांना सामोरं जायचं नव्हतं. यानंतर चहलने रोहित शर्माची मुलाखत घेतली. अनेक दिवसांपासून चहल टीव्हीमध्ये धोनीने यावं अशी चाहत्यांची इच्छा होती. पण धोनीचा पळतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. 

न्यूझीलंड विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात भारताने टॉस जिंकत आधी बॅटींग करण्याचा निर्णय घेतला होता. भारताने 49.5 ओव्हरमध्ये 252 रन केले होते. भारताकडून अंबाती रायडु (90 रन, 113 बॉल, 8  फोर, 4 सिक्स), हार्दिक पंड्या (45 रन, 22 बॉल, 2 फोर, 5 सिक्स), विजय शंकर (45 रन, 64 बॉल, 4 फोर ) आणि केदार जाधव (34 रन, 45 बॉल, 3 फोर) केले.