'विराटला वर्ल्ड कप जिंकू द्यायचा नव्हता म्हणून...'; युवराज सिंहच्या वडिलांची धोनीवर सडकून टीका!

Yograj Singh on MS Dhoni: युवराज सिंगचे (Yuvraj Singh Father) वडील योगराज सिंग (Yograj Singh) यांनी पुन्हा एकदा भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर (MS Dhoni) सडकून टीका केली आहे. 

Updated: Jul 11, 2023, 10:25 PM IST
'विराटला वर्ल्ड कप जिंकू द्यायचा नव्हता म्हणून...'; युवराज सिंहच्या वडिलांची धोनीवर सडकून टीका! title=

Yograj singh Criticized MS Dhoni: मॅचेस्टरच्या मैदानात भारत आणि न्यूझीलंडचा (IND vs NZ) सामना आजही सर्वांच्या लक्षात असेल. वर्ल्ड कप सेमीफायनलचा सामना टीम इंडियाने स्वस्तात गमवला. अतितटीच्या सामन्यात किवींनी 18 धावांनी बाजी मारली अन् फायनलमध्ये जागा मिळवली होती. आता चार वर्षानंतर आजही हा सामना सर्वांच्या लक्षात आहे, त्याला कारण महेंद्रसिंह धोनीचा रनआऊट... अशातच टीम इंडियाचा माजी स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगचे (Yuvraj Singh Father) वडील योगराज सिंग (Yograj Singh) यांनी पुन्हा एकदा भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर (MS Dhoni) सडकून टीका केली आहे. त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत महेंद्रसिंग धोनीवर खळबळजनक आरोप केले आहेत. धोनीच्या 2019 च्या सेमीफायनल सामन्यात केलेल्या कृत्यामुळे माझं रक्त खळवळत असल्याचं योगराज सिंह यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले योगराज सिंह?

चार वर्षांपूर्वी 2019 च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धोनीने मद्दामहून खराब फलंदाजी केली, ज्यामुळे न्यूझीलंडकडून पराभव झाला. त्याच्याशिवाय अन्य कर्णधाराने भारताला वर्ल्ड कप जिंकून द्यावा, अशी त्याची कधीच इच्छा नव्हती, असा गंभीर आरोप योगराज सिंह यांनी केला आहे.

रवींद्र जडेजा एका बाजूने खिंड लढवत होता. जडेजा टीमला भारताला लक्ष्याच्या जवळ नेण्याचा प्रयत्न करत होता, तर धोनी त्याच्या क्षमतेनुसार खेळत नव्हता. जर धोनी त्याच्या क्षमतेच्या 40 टक्केही खेळला असता तर आम्ही 48 व्या षटकातच सामना जिंकू शकलो असतो. मात्र, असं झालं नाही. लॉजिकल गोष्ट आहे की, जडेजा फलंदाजी करत होता तेव्हा तिच विकेट होती. मग धोनीला काय झालं? असा खडा सवाल योगराज सिंह यांनी विचारला आहे.

सेमीफायनल सामन्यात तू मार तू मार करत धोनीने दोन फलंदाज बाद केले. त्यामुळे टीम बॅकफूटवर गेली. जर धोनी जडेजासारखा खेळत राहिला असता तर टीम इंडिया 2 ओव्हरआधीच सामना जिंकली असती, असं योगराज सिंह यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा - Harbhajan Singh: 'आत्ता बस झालं, काही मर्यादा...', रोहितचा विषय निघताच हरभजन चांगलाच भडकला!

दरम्यान, योगराज सिंह यांनी वेळोवेळी महेंद्रसिंह धोनीवर टीका केली आहे. 2014 ला युवराजला चांगली कामगिरी करून संधी दिली जात नसताना योगराज सिंह यांनी धोनीला निशाण्यावर घेतलं होतं. माझ्या मुलाचं करियर खराब करण्यास धोनी कारणीभूत असल्याचं योगराज सिंह यांनी म्हटलं होतं. त्यावेळी युवराजने धोनीची बाजू घेत थालाचा बचाव केला होता. आता पुन्हा योगराज सिंह यांनी धोनीविरुद्ध आग ओकली आहे.