धोनीनं केला विक्रम, झाला दिग्गजांच्या यादीत सामील

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये धोनीची बॅट अजूनही बोललेली नाही.

Updated: Feb 7, 2018, 10:31 PM IST
धोनीनं केला विक्रम, झाला दिग्गजांच्या यादीत सामील title=

केप टाऊन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये धोनीची बॅट अजूनही बोललेली नाही. पण विकेट कीपिंग करताना मात्र धोनीच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन एडन मार्करमला स्टम्पिंग केल्यानंतर धोनीनं वनडे क्रिकेटमध्ये ४०० बळींचा टप्पा गाठला आहे.

धोनीनं आत्तापर्यंत २९४ कॅच आणि १०६ स्टम्पिंग असे मिळून ४०० बळी घेतले आहेत. कुमार संगकारा(४७२), ऍडम गिलख्रिस्ट(४७२) आणि मार्क बाऊचर(४२४) हे खेळाडू धोनीच्या पुढे आहेत. तसंच कॅचचं त्रिशतक पूर्ण करायला धोनीला आणखी ६ कॅचची आवश्यकता आहे. हे रेकॉर्ड करणारा धोनी चौथा विकेट कीपर बनेल. धोनीआधी गिलख्रिस्ट, बाऊचर आणि संगकाराच्या नावावर हे रेकॉर्ड आहे.