धोनीच्या नेतृत्वात आजच्याच दिवशी जिंकला होता वर्ल्डकप आणि आजच राष्ट्रपतींकडून मिळणार सन्मान

महेंद्रसिंग धोनीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीदरम्यान अनेक सन्मान मिळवलेत. २००८मध्ये त्याला आयसीसी वनडे प्लेयर ऑफ दी ईयर अॅवॉर्ड, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आणि २००९ मध्ये भारतातील चौथा सर्वोच्च नागरिक सन्मान, पद्मश्री पुरस्कारासह २००९मध्येच विस्डेनच्या सर्वप्रथम ड्रीम टेस्ट इलेव्हन संघात धोनीचा कर्णधाराचा दर्जाही मिळालाय.

Updated: Apr 2, 2018, 06:45 PM IST
धोनीच्या नेतृत्वात आजच्याच दिवशी जिंकला होता वर्ल्डकप आणि आजच राष्ट्रपतींकडून मिळणार सन्मान title=

मुंबई : महेंद्रसिंग धोनीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीदरम्यान अनेक सन्मान मिळवलेत. २००८मध्ये त्याला आयसीसी वनडे प्लेयर ऑफ दी ईयर अॅवॉर्ड, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आणि २००९ मध्ये भारतातील चौथा सर्वोच्च नागरिक सन्मान, पद्मश्री पुरस्कारासह २००९मध्येच विस्डेनच्या सर्वप्रथम ड्रीम टेस्ट इलेव्हन संघात धोनीचा कर्णधाराचा दर्जाही मिळालाय.धोनीला आज पद्मभूषण मिळणार आहे.

MS dhoni

महेंद्रसिंग धोनीसह या वर्षी ८४ व्यक्तींना पद्म पुरस्कारासाठी निवडण्यात आले. यातील ३ पद्मविभूषण, ९ पद्मभूषण आणि ७२ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. २० मार्च २०१८मध्ये राष्ट्रपती भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या समारंभात या सर्व व्यक्तींना पद्म पुरस्कारांनी गौरवण्यात आले. 

pankaj adwani

यासोबतच बिलियर्ड्स चॅम्पियन पंकज अडवाणीला ही सन्मान मिळणार आहे. दोघांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मान केला जाणार आहे. यावेळी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, राज्यमंत्री किरेन रिजीजू उपस्थित असतील.

MS dhoni2

१९८३ मध्ये चॅम्पियन बनल्यानंतर २८ वर्षांनी धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने वर्ल्डकप जेतेपद पटकावले.