VIRAL झालेल्या 'गुलाबी साडी' गाण्यावर थिरकली धनश्री वर्मा! चाहत्यांना आठवला चहल; पाहा Video

Dhanashree Verma : धनश्री वर्मानं 'गुलाबी साडी' गाण्यावर केला डान्स, मात्र नेटकऱ्यांना आठवला चहल...

दिक्षा पाटील | Updated: Mar 27, 2024, 01:01 PM IST
VIRAL झालेल्या 'गुलाबी साडी' गाण्यावर थिरकली धनश्री वर्मा! चाहत्यांना आठवला चहल; पाहा Video title=
(Photo Credit : Social Media)

Dhanashree Verma : भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलची पत्नी आणि प्रसिद्ध युट्यूबर धनश्री वर्मा ही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी तिचे सोशल मीडिया पोस्ट चर्चेचे कारण ठरतात. तर कधी तिचे बोल्ड फोटो. मात्र, धनश्री कधीच कोणत्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. ती तिच्या कामावर लक्ष केंद्रित करत असते. धनश्री ही एक लोकप्रिय डान्सर आहे. धनश्री सतत सोशल मीडियावर तिचे डान्स व्हिडीओ शेअर करताना दिसते. नुकताच, तिनं एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. तिचा हा डान्स व्हिडीओ महाराष्ट्राच्या लोकांना फार भाळला आहे. त्याचं कारण म्हणजे तिनं एका मराठी गाण्यावर डान्स केला आहे. 

धनश्रीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती गुलाबी साडी या मराठमोळ्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. धनश्रीनं तिच्या डान्सनं पुन्हा एकदा चाहत्यांना घायाळ केलं आहे. या व्हिडीओत धनश्रीनं अबोली रंगाची कुर्ती आणि जीन्स परिधान केली आहे. तर तिच्यासोबत आमखी एक डान्सर आहे. त्या दोघांनी फार सुंदर डान्स केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

धनश्रीच्या या व्हिडीओला 4.3 मिलियन व्ह्यूज आहेत. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, खूप चांगला डान्स केला, फक्त गुलाबी साडी मिसिंग आहे. दुसरा नेटकरी म्हणाला, माझे दोन आवडते डान्सर एकाच फ्रेममध्ये. तिसरा नेटकरी म्हणाला, अरे कमाल झाली मराठी गाणं. आणखी एक नेटकरी म्हणाला, काय कमाल डान्स केला आहे. दुसरा नेटकरी म्हणाला, चलहची पत्नी ऑल राऊंडर आहे. 

दरम्यान, काही नेटकऱ्यांनी धनश्रीला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एक नेटकरी म्हणाला, "चहल भाईला खूप वाईट वाटत असेल." दुसरा नेटकरी म्हणाला, "एकवेळ शत्रू असला तरी चालेल पण धनश्रीसारखी पत्नी नको." तिसरा नेटकरी म्हणाला, "धनश्रीचा हा अजून कोणता बेस्ट फ्रेंड आहे."धनश्रीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अशा अनेक कमेंट करत तिला ट्रोल केलं आहे. 

हेही वाचा : मंदिरात काय मागेमागे...; पत्नी- लेकिसोबत तिरुपतीच्या दर्शनासाठी पोहोचलेला राम चरण पापाराझींवर संतापला

या आधी देखील धनश्रीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं. धनश्रीनं लोकप्रिय डान्स कोरिओग्राफर प्रतिक उतेकरबरोबर फोट शेअर केला होता. ते दोघं 'झलक दिखला जा सिझन 11' मध्ये एकत्र दिसले होते. त्यानंतर त्यांचा फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्या दोघांना ट्रोल करण्यास सुरुवात केली होती.