Ricky Ponting on Rishabh Pant : यंदाच्या आयपीएल हंगामाची (IPL 2024) सुरूवात होण्यासाठी आता फक्त दीड महिन्याचा कालावधी शिल्लक राहिला आहे. अशातच आता ऑक्शनमध्ये सर्व संघांनी नव्या खेळाडूंना संघात सामील करून पूर्ण तयारी केली आहे. दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) यंदाच्या ऑक्शनमध्ये काही नव्या चेहऱ्यांना संधी दिलीये. अशातच आता दिल्लीच्या संघाचा 'पातशाह' म्हणजे ऋषभ पंत यंदाच्या आयपीएल हंगामात खेळणार की नाही? यावर दिल्ली कॅपिटल्सचे कोच रिकी पाँटिंग (Ricky Ponting) याने मोठं वक्तव्य केलंय.
Ricky Ponting काय म्हणतो?
सोशल मीडियावर तुम्ही पाहिलं असेल की, ऋषभ आता चांगल्या प्रकारे कामगिरी करतोय. तो उत्तम प्रकारे चालू आणि मैदानात धावू शकतो. मात्र, आयपीएलच्या पहिल्या सामन्याला आता फक्त 6 आठवडे बाकी आहे. त्यामुळे त्याच्या विकेटकिपिंगबद्दल आम्ही पूर्णपणे सहमत नाही. आमच्यासाठी ही गोष्ट अवघड असेल. आम्हाला आशा आहे की त्याने यंदाच्या हंगामात खेळावं. तो उपलब्ध असेल तर आमच्यासाठी बोनस आहे. असं नाहीये की, त्याने सर्व 14 सामने खेळावे, जर त्याने 10 सामने जरी खेळले तरी आमच्यासाठी ते फायद्याचं राहिल, असं रिकी पाँटिंगने (Ricky Ponting on pant fitness) म्हटलं आहे.
मी गॅरेंटी देऊन सांगतो, जर आत्ताच्या क्षणाला ऋषभला मी विचारलं की तुला आयपीएल खेळायची आहे, तर तो आत्ताही सांगेल की...मी मॅच खेळायला पूर्ण तयार आहे. मी प्रत्येक सामन्यात विकेटकिपिंग आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी तयार आहे. मात्र, आम्ही रिक्स घेणार नाही. तो आमचा चांगला कॅप्टन आहे. गेल्या वर्षी आम्हाला त्याची खूप आठवण आली. गेल्या 12-13 महिन्यांतील त्याचा प्रवास पाहिला तर त्याने खूप मेहनत घेतली आहे. क्रिकेट विसरून जा... तो वाचला हे स्वतःला भाग्यवान समजतो, असंही रिकी पाँटिंग म्हणाला आहे.
दरम्यान, माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मला असं वाटलं होतं की या जगातील माझा वेळ संपलाय. अपघातादरम्यान झालेल्या दुखापतींबद्दल मला माहिती होती, परंतु मी नशीबवान होतो. कारण त्या अधिक गंभीर असू शकल्या असत्या, असं ऋषभ पंत म्हणाला होता. रिकव्हरीचा वेळ कमी करण्यासाठी मला कठोर परिश्रम करावं लागतील याची मला जाणीव होती, असंही ऋषभ पंतने म्हटलं होतं.
दिल्ली कॅपिटल्सचा संघ : अभिषेक पोरेल, एनरिक नॉर्टजे, अक्षर पटेल, डेव्हिड वॉर्नर, इशांत शर्मा, कुलदीप यादव, ललित यादव, लुंगीसानी एनगिडी, मिचेल मार्श, मुकेश कुमार, प्रवीण दुबे, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, सय्यद खलील अहमद, विकी ओस्तवाल, यश धुळ.
नवे खेळाडू : हॅरी ब्रूक, ट्रिस्टन स्टब्स, रिकी भुई, कुमार कुशाग्रा, रसीख दार, झ्ये रिचर्डसन, सुमित कुमार, शाई होप, स्वस्तिक छिकारा.