भारतीय क्रिकेटसाठी आज सोनेरी दिवस, जसप्रीत बुमराहने रचला इतिहास

Jasprit Bumrah Number 1 Test Bowler : भारतीय क्रिकेटसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुहमरा नंबरवन टेस्ट गोलंदाज बनला आहे. भारतीय क्रिकेट इतिासात पहिल्यांदाच एखादा वेगवान गोलंदाज पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. 

राजीव कासले | Updated: Feb 7, 2024, 02:48 PM IST
भारतीय क्रिकेटसाठी आज सोनेरी दिवस, जसप्रीत बुमराहने रचला इतिहास title=

Jasprit Bumrah Number 1 Test Bowler : भारतीय क्रिकेटसाठी आज ऐतिहासिक दिवस आहे. टीमइंडियाचा (Team India) प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुहराहने (Jasprit Bumrah) आयसीसी कसोटी क्रमवारीत (ICC Test Ranking) अव्वल स्थान पटकावलं आहे. बुमराह पहिल्यांदा कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. याआधी आयसीसी कसोटी क्रमवारीत बुमराह कधीच टॉप तीनमध्ये आला नव्हता. बुधवारी आयसीसीने जारी केलेल्या कसोटी क्रमवारीत पहिल्या तीन गोलंदाजांना पछाडत बुमराहने पहिल्या स्थानावर झेप घेतली. आयसीसी कसोटी क्रमवारीत जसप्रीत बुमराह चौथ्या क्रमांकावर होता. गेल्या दोन कसोटी सामन्यात बुमराहने 15 विकेट घेत नंबर वनचा ताज मिळवला आहे. नंबर वनबरोबरच बुमराहने एक मोठा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. 

जसप्रीत बुमराहने रचला इतिहास
जसप्रीत बुमराह क्रिकेट इतिहासातला एकमेव गोलंदाज आहे ज्याने क्रिकेटच्या तीनही फॉर्मेटमध्ये नंबर वनचं स्थान पटकावलं आहे. वन डे आणि टी20 क्रिकेटमध्ये बुमराह एक नंबरवर होता. आता बुमराह टेस्ट क्रिकेटमध्येही अव्वल स्थानावर पोहोचला आहे. इतकंच नाही तर आयसीसी कसोटी क्रमवारीत नंबर वनवर पोहोचणारा जसप्रीत बुमराह हा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. 

आर अश्विनला धक्का
जसप्रीत बुमराहने टीम इंडियाचा महान गोलंदाज आर अश्विनची बादशाहत संपली आहे. अश्विन मोठ्या कालावधीपासून आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर होता. आता अश्विन तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. आयसीसी क्रमवारीत दुसऱ्या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा तर चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आहे. 

जसप्रीत बुमराहची कमाल
भारतीय खेळपट्ट्यांवर फिरकी गोलंदाजांचं वर्चस्व पाहिला मिळतं. पण हैदराबाद आणि विखाखापट्टणम कसोटीत बुमराहने कमाल केली. दोन कसोटी सामन्याच्या चार डावात बुमराहने 15 विकेट घेतल्या आहेत. विशाखापट्टणमची खेळपट्टी फलंदाजांना साथ देणारी आहे. या खेळपट्टीवर बुमराहने सहा विकेट घेतल्या. य कामगिरीमुळे बुमराहला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कारही देण्यात आला. त्याआधी हैदराबाद कसोटी सामन्यात बुमराहने 91 धावात 9 विकेट घेतल्या. या कामगिरीचा परिणाम आयसीसी कसोटी क्रमवारीतही पाहिला मिळाला. 

बुमराहची कसोटी कारकिर्द
जसप्रीत बुमराहने कसोटी कारकिर्दीत शानदार कामगिरी केली आहे. केवळ 34 कसोटी सामन्यात बुमराहने 155 विकेट घेतल्यात. जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका अशा प्रत्येक देशात कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी भरीव कामगिरी केली आहे. तर भारतीय खेळपट्ट्यांवर बुमराहने केवळ 6 कसोटी सामन्यात 29 विकेट घेतल्या आहेत.