मैदानात गर्लफ्रेंडला प्रपोज करणारा क्रिकेटर अखेर अडकला लग्नाच्या बेडीत!

 आयपीएलच्या एका सामन्यादरम्यान चहरने जयाला भर स्टेडियममध्ये प्रपोज केलं होतं. 

Updated: Jun 2, 2022, 07:47 AM IST
मैदानात गर्लफ्रेंडला प्रपोज करणारा क्रिकेटर अखेर अडकला लग्नाच्या बेडीत! title=

मुंबई : टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर दीपक चहरने अखेर गर्लफ्रेंड जया भारद्वाजसोबत लग्नगाठ बांधलीये. आयपीएलच्या एका सामन्यादरम्यान चहरने जयाला भर स्टेडियममध्ये प्रपोज केलं होतं. तेव्हापासून जगभरातील क्रिकेट चाहते या दोघांच्या लग्नाची वाट पाहत होते. 

दीपर चहर आणि जया भारद्वाज या दोघांनी बुधवारी रात्री आग्र्यामध्ये लग्न केलं. अनेक महिन्यांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनी लग्नगाठ बांधलीये. या जोडप्याचे नाते बरेच दिवस चर्चेत होतं.

बेहद सुंदर लग रहा था कपल

लग्नामध्ये दिपक आणि जया हे कपल खूपच सुंदर दिसत होतं. जयाने क्रीम रंगाचा लेहेंगा घातला होता तर दीपकनेही त्याच रंगाची शेरवानी घातली होती. 

आईपीएल मैच के बाद किया था प्रपोज

IPL 2021 मध्ये पंजाब आणि CSK यांच्यात झालेल्या सामन्यानंतर दीपक चहरने जयाला प्रपोज केलं होतं. त्यावेळी जया स्टँडवर बसली होती आणि चहरने तिला प्रपोज केलं होतं. भर स्टेडियममध्ये ही घटना घडली होती.

अफेयर की चर्चा काफी लंबे समय से

दीपक चहर आणि जयाच्या अफेअरची चर्चा खूप दिवसांपासून सुरू होती, मात्र आयपीएलच्या सामन्यानंतर दिपकने प्रपोज केल्यानंतर सर्वांना त्यांच्या नात्याबद्दल खात्री मिळाली. तेव्हापासून हे दोघे कधी लग्नाच्या बंधनात अडकणार याची चाहत्यांना प्रतीक्षा होती.

कौन हैं जया भारद्वाज?

जया ही टीव्ही स्टार सिद्धार्थ भारद्वाजची बहीण आहे. दीपक आणि जया यांची भेट सुमारे वर्षभरापूर्वी मुंबईतील एका मित्राद्वारे झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली त्याचं रूपांतर पुढे प्रेमात झालं.