डिव्हिलियर्सने दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडले

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा कर्णधार ए. बी. डिव्हिलियर्स याने एकदिवसीय क्रिकेट सामन्यातील कर्णधार पद सोडले. मात्र, तो सर्व क्रिकेट सामन्यांत उपलब्ध असेल असे त्याने जाहीर केलेय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 23, 2017, 09:57 PM IST
 डिव्हिलियर्सने दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडले title=

केपटाऊन : दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा कर्णधार ए. बी. डिव्हिलियर्स याने एकदिवसीय क्रिकेट सामन्यातील कर्णधार पद सोडले. मात्र, तो सर्व क्रिकेट सामन्यांत उपलब्ध असेल असे त्याने जाहीर केलेय.

दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज एबी डिव्हिलियर्सने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कर्णधार पदाचा त्याग केलाय. डीव्हीलियर्सने आपल्या कसोटीच्या भविष्यासाठी हा निर्णय घेतला आहे. ऑक्टोबरपासून दक्षिण आफ्रिकेत सुरु होणाऱ्या क्रिकेट सामन्यांसाठी आपण तीन स्वरूपांमध्ये खेळण्यासाठी उपलब्ध असू असे स्पष्ट केलेय.

मे-जूनच्या अखेरपर्यंत त्यांने चॅम्पियन्स करंडक स्पर्धेदरम्यान दक्षिण आफ्रिका संघाचे नेतृत्व केले होते. मात्र, या स्पर्धेत त्याच्या टीमला चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्याचा शेवट हा निराशाजनक झाला.  

डीव्हिलियर्सने सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकलाय. यात त्याने आपले म्हणणे व्यक्त केलेय. पाहा हा व्हिडिओ.