बेकहमचे महागडे शौक! अंडरवेयर ठेवण्यासाठी ५० लाखांचा खर्च

स्टार फूटबॉलपटू डेव्हिड बेकहम आणि त्याची पत्नी विक्टोरियानं त्यांच्या ६० लाख पाऊंड्स किंमत असलेल्या घरात अंडरवेयर ठेवण्यासाठी ६० हजार पाऊंड्स खर्च केला आहे.

Updated: Jan 9, 2018, 09:59 PM IST
बेकहमचे महागडे शौक! अंडरवेयर ठेवण्यासाठी ५० लाखांचा खर्च  title=

मुंबई : स्टार फूटबॉलपटू डेव्हिड बेकहम आणि त्याची पत्नी विक्टोरियानं त्यांच्या ६० लाख पाऊंड्स किंमत असलेल्या घरात अंडरवेयर ठेवण्यासाठी ६० हजार पाऊंड्स खर्च केला आहे. भारतीय रुपयांमध्ये ही किंमत ५० लाख रुपयांपेक्षाही जास्त होते. मिरर डॉट को डॉट यूके या वेबसाईटनं ही बातमी दिली आहे. बेकहमनं त्याच्या या फार्म हाऊसमध्ये आधी मॉलीश कक्ष आणि कॅटवॉक कक्ष बनवला होता.

या फार्म हाऊसमध्ये बेकहमनं ६० हजार पाऊंड्स खर्च करून अंडरवेयर ठेवण्यासाठी वेगळी खोली बांधली आहे. तसंच विक्टोरियानं बेडरूमच्या डाव्या बाजूला डिझायनर कपडे ठेवण्यासाठी वेगळी खोली आहे. तर एक खोली बूट ठेवण्यासाठी आणि दुसरी खोली बॅग ठेवण्यासाठीही आहे.

या खोलीमध्ये वेगवेगळ्या ब्रॅण्ड्सचे शेकडो अंडरवेयर ठेवण्यात आले आहेत. तर मुलांनी या खोलीत जाऊ नये म्हणून दरवाजावर सिक्युरिटी कीपॅड लावण्यात आला आहे. डेव्हिड आणि विक्टोरियानं मागच्यावर्षी ही जागा विकत घेतली होती. बेकहम हा एक स्टार फूटबॉलपटू आहे. त्याची बायको विक्टोरिया आधी गायिका होती तर आता ती फॅशन डिझायनर बनली आहे.