CSK vs DC : दिल्ली जिंकत चेन्नई प्लेऑफमध्ये; पाचव्या विजयाच्या दिशेने 'एक' पाऊल पुढे

CSK vs DC : चेन्नई सुपर किंग्द विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना रंगला होता. चेन्नईने  हा सामनाअखेरीस जिंकला. चेन्नईने सुपर किंग्जने दिल्लीवर 77 रन्सने विजय मिळवला.

Updated: May 20, 2023, 07:47 PM IST
CSK vs DC : दिल्ली जिंकत चेन्नई प्लेऑफमध्ये; पाचव्या विजयाच्या दिशेने 'एक' पाऊल पुढे title=

CSK vs DC : दिल्लीच्या अरूण जेटली मैदानावर चेन्नई सुपर किंग्द विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना रंगला होता. हा सामना चेन्नईने अखेरीस जिंकला. चेन्नईने सुपर किंग्जने हा सामना 77 रन्सने जिंकला. या विजयासह चेन्नईने प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने दिल्ली कॅपिटल्सचा शेवट गोड करण्याचा पूर्ण प्रयत्न केला, मात्र त्याला टीमला विजय मिळवून देता आला नाही. 

चेन्नईच्या फलंदाजांची उत्तम कामगिरी

दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (DC vs CSK) यांच्यातील सामन्यात चेन्नईने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांच्यासाठी फार फायदेशीर ठरला. ऋतुराज गायकवाड आणि ड्वेन कॉनवे यांनी तुफानी फलंदाजी केली. गायकवाडने 50 बॉल्समध्ये 3 फोर आणि 7 सिक्सच्या मदतीने 79 रन्स केले.

दुसरा ओपनर कॉन्वेनेही 52 बॉल्समध्ये 11 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने 87 रन्सची खेळी केली. शिवम दुबेने 9 बॉल्समध्ये 3 सिक्सच्या मदतीने 22 रन्स केले. चेन्नईने एकूण 20 ओव्हर्समध्ये 223 रन्स केले होते.

प्रथम फलंदाजी करताना चेन्नईच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये 3 विकेट्स गमावून 223 रन्स केले होते. हे लक्ष गाठण्यासाठी दिल्ली फलंदाजीला आली असता त्यांच्या टीमला 20 षटकांत 9 विकेट्स गमावून केवळ 146 रन्स करता आले. 77 रन्सने चेन्नईने दिल्लीला धूळ चारली.

चेन्नई सुपर किंग्जने दिलेल्या 224 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीच्या टीमची सुरुवात अत्यंत खराब झाली. गेल्या सामन्याच चांगला खेळलेला पृथ्वी शॉ आज अवघ्या 5 रन्सवर बाद झाला. यानंतर सॉल्ट 3, रोसो 0 आणि यश धुल 13 रन्स करून बाद झाले.

वॉर्नरची कॅप्टन इंनिंग

मात्र दुसरीकडून डेव्हिड वॉर्नर एक बाजू धरून खेळत होता. आजच्या सामन्यात त्याने अर्धशतक झळकावलं. 58 बॉल्समध्ये त्याने 5 सिक्स आणि 7 फोरच्या मदतीने 86 रन्सची खेळी केली. चेन्नईकडून दीपक चहरने 3, पाथिराना-टेकशानाने 2-2 तर जडेजा-देशपांडेने 1-1 विकेट घेतल्या.