Cristiano Ronaldo: भर पत्रकार परिषदेत 'रोनाल्डो'कडून घोडचूक, Al Nassr विषयी बोलताना म्हणाला...; Video व्हायरल!

Al Nassr press conference: सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) क्लब अल नासरमध्ये (Al Nassr) रोनाल्डोच्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

Updated: Jan 5, 2023, 05:18 PM IST
Cristiano Ronaldo: भर पत्रकार परिषदेत 'रोनाल्डो'कडून घोडचूक, Al Nassr विषयी बोलताना म्हणाला...; Video व्हायरल! title=
Cristiano Ronaldo, Al Nassr

Cristiano Ronaldo, Al Nassr : ख्रिस्तियानो रोनाल्डो हे नाव कोणाला माहिती नसेल, असं क्वचित पहायला मिळेल. फुलबॉलचा बादशाह अशी ओळख मिळालेल्या रोनाल्डोला (Cristiano Ronaldo) फुटबॉलच्या फायनलपर्यंत पोहोचता आलं नाही. युरोपियन क्लब सोडून रोनाल्डो आता सौदी अरेबियातील अल नासर क्लबकडून (Al Nassr) खेळणार आहे. रोनाल्डो आणि अल नासर क्लबमध्ये अडीच वर्षांसाठी करार (Cristiano Ronaldo playing for Al Nassr) झालाय. त्यानुसार रोनाल्डोला 1800 कोटी रुपये मिळणार आहेत. एखाद्या फुटबॉलरला मिळणार हे सर्वाधिक मानधन असणार आहे. त्यामुळे आता फुटबॉलविश्वात चर्चा सुरू असल्याचं पहायला मिळतंय. (Cristiano Ronaldo calls Saudi Arabia South Africa in embarrassing first Al Nassr press conference blunder video goes viral marathi news)

सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) क्लब अल नासरमध्ये (Al Nassr) रोनाल्डोच्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी रोनाल्ड़ोला प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना रोनाल्डोकडून घोडचूक झाल्याचं पहायला मिळालं. पत्रकार परिषदेत (Press conference) रोनाल्डोने सौदी अरेबियाचा उल्लेख दक्षिण अफ्रिका (South Africa) असा केला.

आणखी वाचा - Cristiano Ronaldo आता नवीन क्लबकडून खेळणार, रेकॉर्डब्रेक किंमतीत केलं साईनकाय म्हणाला Cristiano Ronaldo?

माझ्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघात येणं म्हणजे माझ्या करिअरचा शेवट नाही. लोक काय म्हणतात याची मला खरोखर काळजी वाटत नाही, असं रोनाल्डो म्हणाला.  मी माझा निर्णय घेतलाय आणि तो बदल स्वीकारण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, परंतु माझ्यासाठी मी येथे आल्याचा आनंद खरोखर खूप मोठा असल्याचं रोनाल्डोने म्हटलं आहे. त्याचा हा व्हिडिओ (Cristiano Ronaldo Video) सध्या व्हायरल होताना दिसतोय.

पाहा Video - 

दरम्यान, मी इथं जिंकण्यासाठी, खेळण्यासाठी त्याचबरोबर आनंद घेण्यासाठी आलोय. या देशाच्या सांस्कृतिक यशाचा मला भाग बनायचंय. मी पोर्तुगालच्या कल्बच्या ऑफर नाकारल्या कारण मला इथं येयचं होतंय, म्हणून मी या कल्बची निवड केली, असंही तो म्हणाला आहे. मँचेस्टर युनायटेड (Manchester United), रियल माद्रिद (real madrid) आणि युव्हेंट्स या कल्बकडून दमदार कामगिरी केल्यानंतर आता रोनाल्डोने नवा रस्ता पकडला आहे.