'या' हिंदी सिनेमात झळकला होता कर्णधार रोहित शर्मा; दिग्गज कलाकरांसोबत साकारलेली मुख्य भुमिका

Rohit Sharma : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने एका सिनेमात काम केले होते. 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या एका हिंदी सिनेमात रोहित शर्मा झळकला होता.

Updated: Feb 2, 2024, 12:06 PM IST
'या' हिंदी सिनेमात झळकला होता कर्णधार रोहित शर्मा; दिग्गज कलाकरांसोबत साकारलेली मुख्य भुमिका title=

Rohit Sharma News In Marathi : बॉलिवूड आणि क्रिकेट यांचं नातं तसं काही नवीन नाही. पण तुम्हाला माहितेय का ? टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने एका सिनेमात काम केले होते. 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या एका हिंदी सिनेमात रोहित शर्मा झळकला होता. हरमन बावेजा, अमृता राव आणि अनुपम खेर या सिनेमात मुख्य कलाकर होते. सध्या या सिनेमातील छोटी व्हिडीओ क्लीप व्हायरल होत आहे.

'या' सिनेमात झळकला होता रोहित

व्हिक्टरी ( Victory)  या हिंदी सिनेमातील व्हिडीओनुसार रोहित शर्मा नेटवर फलंदाजी करताना अचानक त्याच्या पायाला मार लागल्याने त्याला सामन्यातून बाहेर पडणे भाग पडते. त्यामुळे त्याच्या जागी सिनेमाचा नायक येतो. ही क्लीप सध्या खूप व्हायरल होत आहे. 

इंग्लंड विरुद्ध दुसरी टेस्ट मॅच

टीम इंडियाचा आघाडीचा कर्णधार म्हणून रोहित शर्माला ओळखले जाते. नुकत्याच झालेल्या हैदराबादच्या सामन्यात टीम इंडियाला पराभव स्विकारावा लागला.टीम इंडियाच्या वाट्याला आलेल्या अपयशावर  इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन याने केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हैदराबाद येथे झालेल्या सामन्यात कर्णधार पदाची जवाबदारी असताना या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला.

त्यावर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन म्हणाला की, विराट कोहली टीम इंडियाचा कर्णधार असता तर, इंडियाचा पराभव झाला नसता. सामन्यादरम्यान रोहितचे खेळाकडे लक्ष नव्हते, त्याचबरोबर त्याचे कर्णधार पदावर असताना नेतृत्त्व कौशल्य कमी पडले असे, मायकेल वॉन याने म्हटले आहे.  वॉन पुढे असंही म्हणला की, रोहितचे नेतृत्त्व कौशल्य अतिसामान्य होते जे कर्णधार पदाकरीता पुरेसे नव्हते. विराटने काही कारणास्तव कर्णधार पदाची जवाबदारी स्विकारली नाही. त्यामुळे या सामन्यादरम्यान मला विराट कोहलीच्या नेतृत्त्वाची कमी वारंवार भासत राहिली. 

रोहित शर्मा एक चांगला खेळाडू असला तरी त्याला योग्यवेळी पाहिजे तसे निर्णय घेता आले नाही हे या सामन्यातून स्पष्ट दिसून आले आहे. जर विराट कोहली या सामन्यात इंडियाचा कर्णधार असता, तर  केवळ 20 धावांकरीता इंडियाला पराभव पत्कारावा लागला नसता. असे इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन याने एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. त्यामुळे सध्या टीम इंडिया आणि रोहित शर्माच्या फॅन्सनी  मायकेल वॉनच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे.