Video : युजवेंद्र चहलच्या पत्नीची अदाकारी पाहून नेटकरी म्हणतात 'लय भारी'

युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी, धनश्री वर्मा सोशल मीडियाच्या माध्यमातून कायमच नेटकऱ्यांची मनं जिंकत असतात

Updated: Jul 1, 2021, 05:08 PM IST
Video : युजवेंद्र चहलच्या पत्नीची अदाकारी पाहून नेटकरी म्हणतात 'लय भारी' title=
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी, धनश्री वर्मा सोशल मीडियाच्या माध्यमातून कायमच नेटकऱ्यांची मनं जिंकत असतात. एखादं मीम पोस्ट करणं असो, नक्कल करणारा व्हिडीओ शेअर करणं असो किंवा आणखी काही. या जोडीपैकी कोणीही सोशल मीडियावर काहीही शेअर केलं, की त्याची चर्चा झाल्यावाचून राहत नाही. 

याच सुपरहिट जोडीतील धनश्री वर्मा चहल हिनं इन्स्टाग्रामच्या माध्यामातून आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिची नृत्यातील अदाकारी पाहण्याची संधी सर्वांनाच मिळत आहे. डान्स व्हिडीओ शेअर करण्याची धनश्रीची ही काही पहिलीच वेळ नाही. 

Rohit Sharma नं कोट्यवधींना विकला लोणावळ्यातील व्हिला, किंमत ऐकून व्हाल थक्क 

 

दरवेळी युजीची पत्नी तिच्या अफलातून नृत्य कौशल्यानं सर्वांनाच अवाक् करते. यावेळीही तिनं अशीच जादू साऱ्यांच्या मनावर केली आहे. येत्या काही दिवसांमध्ये धनश्रीचा एक डान्स व्हिडीओ सर्वांच्या भेटीला येणार आहे. ज्यासाठीच तिनं एक झलक फॉलोअर्सच्या भेटीला आणली. तिनं हा व्हिडीओ शेअकर करताच त्यावर लाईक्स आणि कमेंट्सची बरसात झाली. 

धनश्रीची लोकप्रियताही युजीला टक्कर देणारी 

एक प्रोफेशनल डान्सर असण्यासोबतच धनश्री कोरिओग्राफर आणि युट्यूबरही आहे. इन्स्टाग्रामवर तिचे लाखोंच्या संख्येनं फॉलोअर्स असून, हा आकडा तिचा पती म्हणजे युजवेंद्र चहल याच्या लोकप्रियतेलाही टक्कर देत आहे. 2014 मध्ये डीवाय पाटील डेंटल कॉलेजमधून पदवीधर झालेली धनश्री एक दंतचिकित्सकही आहे.