निवृत्तीनंतर धोनीचा रांचीला रामराम? पत्नीनं दिले याचे संकेत

हा त्याच्या जीवनातील सर्वात मोठा निर्णय ठरु शकतो 

Updated: Nov 12, 2020, 08:50 AM IST
निवृत्तीनंतर धोनीचा रांचीला रामराम? पत्नीनं दिले याचे संकेत title=
छाया सौजन्य - सोशल मीडिया

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवत सर्वाधिक यशस्वी कर्णधार म्हणून ओखळ निर्माण करणारा Mahendra singh dhoni महेंद्रसिंह धोनी सध्या बऱ्याच कारणांनी चर्चेत आहे. एकिकडे माही IPL 2020 आयपीएलच्या १३ व्या हंगामासाठी दुबईला गेलेला असतानाच दुसरीकडे त्याचं कुटुंब मात्र इथं भारतातच रांची येथे असणाऱ्या त्याच्या फार्महाऊसवर वास्तव्यास असल्याचं म्हटलं गेलं. 

लॉकडाऊनच्या सबंध काळातही तो इथंच वेळ व्यतीत करताना दिसला होता. सोशल मीडियावर याची झलकही अनेकांनाच पाहायला मिळाली. रांची हे ठिकाण धोनीच्या मनाच्या अगदी जवळचं. पण, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती घेणारा धोनी याच शहरापासून काहीसा दूर जाऊ शकतो. सध्या माध्यमं आणि क्रीडारसिकांमध्ये याबाबतच्या चर्चांना प्रचंड उधाम आलं आहे. निमित्त ठरत आहे ते म्हणजे धोनीच्या पत्नीनं म्हणजेच साक्षी धोनी हिनं सोशल मीडियावर शेअर केलेले काही फोटो. 

मुंबईतील एका निर्माणाधीन घराचे फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर करत सर्वांचं लक्ष वेधलं. सी- फेसिंग व्ह्यू असणाऱ्या या घराचे फोटो आणि त्यावर साक्षीनं दिलेलं कॅप्शन पाहता धोनी आणि त्याचं कुटुंब आता लवकरच मुंबईत वास्तव्यास येण्याची चिन्हं असल्याचं म्हटलं जात आहे.

architectural designer शांतनू गर्गनंही हेच फोटो सोशल मीडियावर शेअर केले. Final Cast of my dream असं लिहित साक्षीनं हे फोटो पोस्ट केले आहेत. त्यामुळंच माही रांचीतून आता त्याचा मोर्चा मुंबईकडे वळवणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. याबाबत कोणतीही स्पष्टोक्ती करण्यात आलेली नाही. 

 

सध्या धोनी आणि त्याच्या पत्नीनं मिळून त्यांच्या निर्मिती संस्थेच्या कामातही लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार साक्षीचं योगदान यात जास्त असल्याचं कळत आहे. त्यामुळं आता कामानिमित्त किंवा कायमस्वरुपी वास्तव्यास असं नेमकं कोणत्या कारणामुळं धोनी मुंबईत येतो याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. तो रांचीतून मुंबईत वास्तव्यास आल्यास हा त्याच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय असेल असं म्हणायला हरकत नाही.