माजी क्रिकेटर जोगिंदर शर्माच्या वडिलांवर हल्ला

भारताचा माजी क्रिकेटर जोगिंदर शर्माचे वडील ओम प्रकाश शर्मा यांच्यावर दोन बाईकस्वारांनी हल्ला केलाय. चोरीच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आलाय.

Updated: Jul 17, 2017, 04:22 PM IST
माजी क्रिकेटर जोगिंदर शर्माच्या वडिलांवर हल्ला title=

रोहतक : भारताचा माजी क्रिकेटर जोगिंदर शर्माचे वडील ओम प्रकाश शर्मा यांच्यावर दोन बाईकस्वारांनी हल्ला केलाय. चोरीच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आलाय.

रोहतकमधील काठमांडीजवळ ओम प्रकाश यांचे दुकान आहे. शनिवारी रात्री ओम प्रकाश दुकान बंद करत होते. यावेळी बाईकवरील दोन तरुण आले. त्यांनी सिगारेट आणि ड्रिंक्स विकत घेतले आणि ते निघून गेले. मात्र काही मिनिटांनी पुन्हा ते तेथे आले आणि त्यांनी शर्मा यांच्यावर हल्ला केला.

शर्मा यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, त्या तरुणांनी आधी माझ्या खिशातून पैसे लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र जेव्हा मी प्रतिकार केला तेव्हा त्यांनी चाकूच्या सहाय्याने माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. चाकूचा धाक दाखवत त्यांनी माझ्या दुकानातून सात हजार रुपयांची कॅश नेली. 

इतकंच नव्हे तर त्या हल्लेखोरांनी शर्मा यांना दुकानात बंद करत बाहेरून टाळे लावले आणि ते निघून गेले. शर्मा यांनी तातडीने आपला मुलगा दीपक याला बोलावले. त्यानंतर शर्मा यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

दरम्यान, हल्ल्याचा प्रतिकार करताना शर्मा यांच्या हातावर जखमा झाल्या. मात्र त्यांना आता रुग्णालयात डिस्चार्ज देण्यात आल्याचे दीपकने सांगितले.