Virat Kohli Drawing : भारत आणि बांगलादेशदरम्यान झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) फ्लॉप ठरला. कोहलीने पहिल्या डावात 6 तर दुसऱ्या डावात 17 धावा केल्या. या कसोटीत विराट फ्लॉप ठरला, पण दुसऱ्या कसोटीत विराटकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. मोठ्या ब्रेकनंतर मैदानावर उतरलेल्या विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. केवळ मैदानावरच नाही तर मैदानाबाहेरही विराट कोहली तितकाच लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर त्याचे करोडोत फॉलोअर्स आहेत.
विराट कोहलीचा व्हिडिओ व्हायरल
आपल्या फलंदाजीसाठी विराट कोहली जगभरात प्रसिद्ध आहे. इतकंच नाही तर भारतातील सर्वात हँडसम सेलिब्रेटींमध्ये विराटची गणना होते. पण विराटच्या फलंदजीप्रमाणेच त्याची ड्रॉईंगही तितकची सुंदर आहे का? सोशल मीडियावर विराटच्या चित्रकलेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
विराट कोहलीने आपल्या अधिकृत इन्स्ट्राग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत विराट कोहली एका खूर्चीत बसला असून त्याच्यासमोर ड्रॉईंग बोर्ड (Virat Kohli Drawing) दिसत आहे. त्याला एका मांजरीचं चित्र काढण्याचं चॅलेंज देण्यात आलं आहे. काही वेळाने मांजरीचा पेहराव केलेला व्यक्ती विराटच्या समोर असलेल्या सोफ्यावर येऊन चित्रासाठी पोझ देताना दिसतोय. वास्तविक हा प्यूमा कॅट (Pume Cat) आहे. त्याला पाहून विराट कोहली चित्र काढताना दिसतोय.
लहान मुलापेक्षा वाईट चित्र
चित्र पूर्ण झाल्यावर कॅमेरा त्याच्या ड्रॉईंग बोर्डवर येऊन थांबतो, ज्यावेळी विराटने मांजरीचं काढलेलं चित्र दिसतं, ते पाहून तुम्ही स्वत:चं हसू रोखू शकणार नाही. एका लहान मुलापेक्षाही वाईट चित्र विराटने काढलं आहे. या चित्राच्या खाली विराटने आपली सही देखील केली. या व्हिडिओला लाखोने व्ह्यूज मिळाले आहेत. यावर युजर्सने अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सने विराटला चित्र काढण्यापेक्षा तू बॅटिंगच कर असा सल्ला दिला आहे.
विराट कोहली विक्रम रचणार
चेन्नई कसोटीत विराट कोहली फ्लॉप ठरला असला तरी कानपूर कसोटी सामन्यात विराट कोहलीला एक मोठा विक्रम खुणावतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 27 हजार धावांचा टप्पा ओलांडण्यासाठी विराट कोहलीला आता केवळ 35 धावांची गरज आहे. कसोटी, एकदिवसीय आणि टी20 अशा क्रिकेटच्या तीनही फॉर्मेटमध्ये विराट कोहली आतापर्यंत 534 सामने खेळला असून यात त्याने 26,965 धावा केल्या आहेत. 27 हजार धावांचा टप्पा पूर्ण केल्यास अशी कामगिरी करणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला तो चौथा फलंदाज ठरेल.