WTC अंतिम फेरीसाठी टीम इंडियात होणार 'या' धाकड खेळाडूची एन्ट्री, आयपीएलमध्ये करतोय धमाका

आयपीएलनंतर पुढच्याच महिन्यात म्हणजे जून महिन्यात भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळवली जाणार आहे. स्पर्धपूर्वीच केएल राहूल दुखापतग्रस्त झाल्याने या खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता आहे. 

राजीव कासले | Updated: May 6, 2023, 02:15 PM IST
WTC अंतिम फेरीसाठी टीम इंडियात होणार 'या' धाकड खेळाडूची एन्ट्री, आयपीएलमध्ये करतोय धमाका title=

Team India WTC : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल (IPL 2023) स्पर्धा आता मध्यावर आली असून येत्या 28 मे रोजी अंतिम सामना खेळवला जाणार आहे. त्यानंतर लगेचच म्हणजे जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची (World Test Championship) अंतिम फेरी खेळवली जाणार आहे. लंडनच्या ओव्हल क्रिकेट स्टेडिअमवर (Ovel Stadium) 7 ते 11 जूनदरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (India vs Auastralia) हा सामना रंगणार आहे. पण अंतिम सामन्यआधीच भारतीय संघाला (Team India) मोठा धक्का बसला. टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि विकेटकीपर केएल राहुल (KL Rahul) दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. आपपीएलमध्ये बंगलोरविरुद्धच्या सामन्यात केएल राहुलच्या मांडीला दुखापत झाली. त्याच्यावर पायावर शस्त्रक्रिया केली जाणार आयपीएलच्या पुढच्या सामन्यातही तो खेळू शकणार नाहीए. 

राहुलच्या जागी कोणाला संधी मिळणार?
केएल राहुल दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्या जागी आता कोणत्या खेळाडूला टीम इंडियात संधी मिळणार याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. यासाठी अनेक खेळाडूंची नावं चर्चेत आहेत. पण यात अव्वल स्थानावर आहे तो टीम इंडियाचा धकाडेबाज फलंदाज MR. 360 अर्थात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav). आयपीएलमध्ये सूर्यकुमार सध्या जबरदस्त फॉर्मा आहे. त्या आधारावर त्याला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियिशिपसाठी भारतीय क्रिकेट संघात संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

याआधी बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत सूर्यकुमार यादवला संधी देण्यात आली होती. पण यात त्याला मोठी कामगिरी करता आली नाही. एक कसोटी सामन्यात त्याला केवळ आठ धावा करता आल्या होत्या. पण सध्याचा त्याचा फॉर्म बघता बीसीसीआय पुन्हा एकदा सूर्यावर विश्वास दाखवू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सूर्याला यूके वीजा तयार ठेवण्यासही सांगण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, सरफराज खान, ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, वेगवान गोलंदाज मुकेश कुमार आणि नवदीप सैनी यांना डब्लूटीसी फायनलसाठी स्टँडबाय खेळाडू म्हणून निवडलं आहे. त्यामुळे यातला एका खेळाडूलाही संधी मिळण्याची शक्यता आहे. 

सूर्याची क्रिकेट कारकिर्द
2010 मध्ये सूर्यकुमार यादवने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याने 79 फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 5549 धावा केल्या आहेत. यात त्याने 14 शतकं आणि 28 अर्धशतकं लगावली आहेत. त्याचा हायेस्ट स्कोर 200 धावा आहे. या कामगिरीच्या जोरावर त्याला टीम इंडियात एन्ट्री मिळाली. 2021 मध्ये श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. भारतासाठी खेळलेल्या 23 एकदिवसीय सामन्यात सूर्याने 433 धावा केल्या आहेत. यात दोन हाफसेंच्यूरीचा समावेश आहे. तर आतापर्यंत केळलेल्या 48 टी20 सामन्यात 1675 धावा केल्या आहेत. या अनुभावच्या जोरावर त्याला टीम इंडियात संधी मिळण्याची शक्यता आहे.