Shoaib Malik Match Fixing in BPL 2024 : सना जावेदबरोबर तिसरं लग्न करणारा पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब मलिकच्या अडचणीत वाढ झाली आहे. मलिकवर मॅच फिक्सिंगचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर आता शोएब मलिकचा क्रिकेट करार रद्द करण्यात आला आहे. बांगलदेश प्रीमिअर लीगमध्ये खेळणाऱ्या शोएब मलिक (Shoaib Malik) ज्या संघातून खेळत होता. त्या संघाने मलिकबरोबरचा करार रद्द केल आहे. बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये शोएब फॉर्च्युन बारिशल (Fortune Barishal) संघाकडून खेळत होता. 22 जानेवारीला मीरपूरमध्ये खुलना टायगर्सविरुद्ध (Khulna Tigers) खेळवण्यात आलेल्या एका सामन्यात शोएब मलकिने सलग तीन नो बॉल टाकले. शोएब मलिकने नो बॉल जाणून बाजून टाकल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला. सोश मीडियावरही मोठ्या प्रमाणावर टीका झाली.
याप्रकरणी शोएब मलिकविरुद्ध मॅच फिक्सिंगचा (Match Fixing) आरोप लावण्यात आला असून याची सखोल चौकशी केली जाणार आहे. यात शोएब दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.. दोषी आढळल्यास शोएबवर बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये (BPL) खेळण्यापासून कायमची बंदी लावली जाऊ शकते. इतकंच नाही तर इतर टी20 प्रीमिअर लीग खेळण्यावरही फूलस्टॉप लागू शकतो.
पॉवर प्लेमध्ये मलिकची बॉलिंग
बीपीएलमध्ये फॉर्च्यून बरिशल संघाचं नेतृत्व तमीम इक्बाल करतो. खुलना टायगर्सविरुद्धच्या सामन्यात पहिली फलंदाजी करताना फॉर्च्युन संघाने 4 विकेट गमावत 187 धावा केल्या होत्या. मुशफिकीर रहिमने 68 धावा केल्या. खुलना टायगर्स फलंदाजीसाठी उतल्यानंतर कर्णधार तामिम इक्बालने पॉवरप्लेमध्ये शोएब मलिकला गोलंदाजी करण्यास दिली. पण शोएब मलिक चांगलाच महागडा ठरला.
41 वर्षीय शोएब मलिकने सामन्याच्या चौथ्या षटकात तीन नो बॉल टाकले. षटकातले शेवटचे दोन चेंडून त्याने सलग दोन नोबॉल टाकले. दुसऱ्या नोबॉलवर एक चौकाही लगावला. तर शेवटच्या नोबॉलवर फ्रिहिटवर षटकार लगावला. मलिकने एकाच ओव्हरमधअेय तब्बल 18 धावा दिल्या. पहिल्या पाच चेंडूत मलिकने केवळ 6 दिल्या होत्या पण त्यानंतरच्या दोन चेंडूवर त्याने बारा धावा दिल्या. या प्रकारावर मॅच फिक्सिंगची मागणी करण्यात आली होती. .
या सामन्यात इविन लुईसने 5 षटकार लगावत 22 चेंजूत 53 धावा केल्या. तर अफीक हुसेनने 36 चेंडूत 41 धावा केल्या. विकेटकिपर शाय होपने 10 चेंडूत 25 धावा केल्या. हा सामना खुलना टायगर्सने 18 व्या षटकात 2 विकेट गमावून जिंकला होता
शोएब मलिकची क्रिकेट कारकिर्द
शोएब मलिक पाकिस्तान संघासाठी 35 कसोटी सामने खेळला. यात त्याने 1898 धावा केल्या. तर 32 विकेट घेतल्या. 287 एकदिवसीय क्रिकेटमध्ये शोएबने 7534 धावा आणि 158 विकेट घेतल्या. तर 124 टी20 सामन्यात 2435 धावा आणि 28 विकेट त्याच्या नावावर आहेत.