मुंबई : छत्तीसगडमधील Chhattisgarh) शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Shaheed Veer Narayan Singh International Stadium) भारत (India) आणि बांग्लादेशचे (Bangladesh) माजी खेळाडू पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. या सामन्यात सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) एक झलक पाहायला मिळाली
सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) बांग्लादेश लेजेंड्स (Bangladesh Legends) विरुद्ध खेळत असल्याचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात मास्टर ब्लास्टर आपल्या 10 नंबरच्या जर्सीसह मैदानात उतरलेला दिसत आहे. त्याला पुन्हा एकदा मैदानावर पाहून भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी हा क्षण अविस्मरणीय ठरला. सचिनची झलक पाहायला मिळाल्याने चाहते खूश होते.
The number 10 on the field
Watch the @Unacademy Road Safety World Series LIVE only on @Colors_Cineplex, #RishteyCineplex and for free on @justvoot pic.twitter.com/MBvJdNJ1WB
— Road Safety World Series (@RSWorldSeries) March 5, 2021
वीरेंद्र सेहवागसह (Virender Sehwag) मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) हा सामना जिंकला. त्याने 26 चेंडूत 33 नाबाद धावा केल्या. या दरम्यान त्याने 5 चौकार ठोकले. सचिनची एक झलक पाहायला प्रेक्षक पूर्णपणे उत्सुक झाले होते आणि स्टेडियममध्ये त्याच्या नावाचे फलकही दिसत होते.
इंडिया लीजेंड्सला (India Legends) 110 धावांचे सोपे उद्दीष्ट मिळाले. यजमानांच्यावतीने वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकरने (Virender Sehwag) एक शानदार खेळ दाखवून 10.1 षटकांत 114 धावा करून हा सामना जिंकला. सचिन आणि वीरेंद्र सेहवागज शेवटपर्यंत नाबाद राहिले.
Back to winning ways! #IndiaLegends win the opening game of the @Unacademy Road Safety World Series. #YehJungHaiLegendary
Shoutout to #BangladeshLegends for a stellar fight! pic.twitter.com/D9PUAzbGpA
— Road Safety World Series (@RSWorldSeries) March 5, 2021
वेगवान डाव खेळताना इंडिया लेजेंड्सचा (India Legends) सलामीवीर वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) फक्त 35 चेंडूंत 80 नाबाद धावा फटकावल्या. या दरम्यान त्याने 10 चौकार आणि 5 षटकार लगावले. स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांनी जोरदार जल्लोष केला आणि यजमान संघाने हा सामना 10 गडी राखून जिंकला.