क्रिकेटर जसप्रित बुमराह कुणाशी बांधतोय लग्नगाठ? या आठवड्यातच उडवणार लग्नाचा बार ?

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आता सुट्टीवर आहे आणि सध्या सुरु असलेल्या मॅचमध्येही तो खेळत नाही, त्यामुळे ही शक्यता नाकारता येत नाही की तो या आठवड्यात लग्न करु शकतो.

Bollywood Life | Updated: Mar 5, 2021, 08:57 PM IST
क्रिकेटर जसप्रित बुमराह कुणाशी बांधतोय लग्नगाठ? या आठवड्यातच उडवणार लग्नाचा बार ?  title=

मुंबई : सिने जगतातले कलाकार आणि क्रिकेटर यांचे एकमेकांशी असलेले नाते काही नवीन नाही. अशा बातम्या आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतात. त्यातल्या काही अफवा असतात तर काही बातम्या खऱ्या देखील असतात. अगदी शर्मिला टागोरपासून ते एक्ट्रेस अनुष्का शर्मापर्यंत अनेक अभिनेत्रींची लग्न क्रिकेटर्ससोबत झाली आहेत. एखाद्या सुंदर अभिनेत्रीने versatile क्रिकेटरच्या प्रेमात पडणे, यात नवल वाटण्यासारखे काहीच नाही.

अशीच एक बातमी सध्या सोशल मीडियावर ट्रेंडीग होत आहे, ती म्हणजे भारतीय क्रिकेटर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि साउथ फिल्म अभिनेत्री अनुपमा परमेश्वरम (Anupama Parameshwaran) यांच्या लग्नाची. त्यांच्या बद्दल अशीही बातमी येत आहे की, हे दोघे याच आठवड्यात लग्न करणार आहे. 

विशेष म्हणजे क्रिकेटर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आता सुट्टीवर आहे आणि सध्या सुरु असलेल्या मॅचमध्येही तो खेळत नाही, त्यामुळे ही शक्यता नाकारता येत नाही की ते दोघे या आठवड्यात लग्न करु शकतात.

या बाबतची ठोस माहिती अजुनपर्यंत समोर आलेली नाही किंवा दोघांपैकी एकानेही यावर हो किंवा नाही असं काहीही म्हटलेलं नाही. पण त्यांच्या फॅनकडून या बाबतची चर्चा मात्र सुरु आहे. सुत्रांचा असाही दावा आहे की, हे कपल गोव्यामध्ये लग्न करणार तर काही जण असेही म्हणत आहेत की त्यांचे लग्न गुजरातमध्ये होणार आहे. 

या आधीही अनुपमा परमेश्वरम (Anupama Parameshwaran) आणि जसप्रीत बुमराह यांच्या अफेअरबद्दल चर्चा सुरु होती. तसेच ते दोघे एकमेकांना डेट देखील करत आहेत अशा बातम्या सोशल मीडियावर उठल्या होत्या. त्याबद्दल अनुपमाला विचारले असता. 

"मी त्याला ओळखत नाही. तो एक भारतीय क्रिकेटर आहे एवढेच मला माहित आहे, बस यापेक्षा जास्त मला काहीच माहिती नाही. हे खरोखरच खूप वाईट आहे की अशा बातम्या सोशल मीडियावर इतक्या व्हायरल होतात, ज्या एका महिलेसाठी अपमानास्पद आहे."