Team India T20 Coach: राहुल द्रविडची उचलबांगडी होणार? 7 वर्षानंतर टीम इंडियाला मिळणार विदेशी कोच

आयसीसीच्या टी20 स्पर्धांमधील टीम इंडियाच्या निराशाजनक कामगिरीमुळे BCCI नाराज, मुख्य कोच राहुल द्रविडला पर्याय शोधण्याचा विचार

Updated: Dec 29, 2022, 06:28 PM IST
Team India T20 Coach: राहुल द्रविडची उचलबांगडी होणार? 7 वर्षानंतर टीम इंडियाला मिळणार विदेशी कोच title=

Rahul Dravid Team India Coach: श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी (India vs Sri Lanka T20 Series) बीसीसीआयने (BCCI) टीम इंडियाची (Team India) घोषणा केली. पण ही घोषणा करताना बीसीसीआयने काही आश्चर्यकारक निर्णय घेतले. भारताचे स्टार खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli), के एल राहुल (KL Rahul) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांना विश्रांती देत टीम इंडियाची कमान हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) खांद्यावर सोपावली. तर मुंबईकर सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) थेट उपकर्णधारपदी नेऊन बसवलं. अशात आत टीम इंडियाच्या कोचपदाबाबतही बीसीसीआय लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता भारतीय क्रिकेट वर्तुळात वर्तवली जातेय.  

टीम इंडियाचे प्रमुख कोच म्हणून द वॉल राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्यावर जबाबदारी आहे. पण लवकरच राहुल द्रविड यांची उचलबांगडी होण्याची चर्चा आहे. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे गेल्या काही निर्धारित षटकांच्या स्पर्धा आणि मालिकांमध्ये टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक झाली आहे. अशात याचं खापर राहुल द्रविड यांच्यावर फोडलं जात आहे. त्यामुळे टी20 प्रकारात एखाद्या विदेश दिग्गज खेळाडूला भारतीय संघाचा कोच (Foreign Coach) बनवलं जाऊ शकतं.

टी20 वर्ल्ड कप 2021 (T20 World Cup 2021) मध्ये टीम इंडियाला ग्रुप स्टेजमध्येच बाहेर पडावं लागलं होतं. तर एशिया कपमध्येही (Asia Cup) टीम इंडियाची हीच अवस्था होती. टी20 वर्ल्ड कप 2022 (T20 World Cup 2022) मध्ये भारताला अंतिम फेरी गाठता आली नाही. सेमीफायनलमध्ये टीम इंडियाला इंग्लंडकडून 10 विकेटने लाजीरवाणा पराभव स्विकारावा लागला होता.

राहुल द्रविडला पर्याय शोधणार?
बीसीसीआयने राहुल द्रविडला पर्याय देण्याचा पूर्ण विचार केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. लवरकच क्रिकेट अॅडव्हाजरी कमिटीच्या (CAC)बैठकीत याबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेटमध्ये लवकरच स्प्लिट कोचिंगचा फॉर्म्युला लागू होऊ शकतो. म्हणजे कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटसाठी राहुल द्रविडच कोच असतील. तर टी20 क्रिकेटसाठी एखाद्या विदेशी कोचची नियुक्ती केली जाऊ शकते. जर असं झालं तर तब्बल सात वर्षांनंतर पहिल्यांदा भारतीय क्रिकेट संघाला विदेश कोच मिळू शकतो.

हे ही वाचा: Corona in India : भारतात पुन्हा कोरोनाची लाट? नागरिकांनो काळजी घ्या, पुढील चाळीस दिवस महत्त्वाचे

7 वर्षांनंतर विदेशी कोच
 2015 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासाठी विदेशी कोच होता. झिम्बाब्वेचे माजी दिग्गज खेळाडू डंकन फ्लेचर यांच्याकडे मुख्य कोचची जबाबदारी होती. त्यानंतर आता 7 वर्षांनी टीम इंडियाला पुन्हा विदेशी कोच मिळण्याची शक्यता आहे. इंग्लंड कसोटी संघासाठी ब्रँडन मॅक्युलमवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याच धर्तीवर बीसीसीआयही स्ल्पिट कोचिंगचा फॉर्म्युला अंमलात आणू शकतं.