एशिया कपच्या तोंडावर मोहम्मद शमीच्या अडचणीत वाढ, हसीन जहां प्रकरणात कोर्टाने दिला 'हा' आदेश

Mohammed Shami Hasin Jahan Case: 30 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या एशिया कप स्पर्धेसाठी बीसीसीआयने 17 खेळाडूंच्या भारतीय संघाची घोषणा केली आहे. प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमीने संघात पुनरागमन केलं आहे. पण स्पर्धेला काही दिवसांचा अवधी बाकी असतानाच मोहम्मद शमीच्या अडचणीत वाढ झाली आहे.

राजीव कासले | Updated: Aug 23, 2023, 05:10 PM IST
एशिया कपच्या तोंडावर मोहम्मद शमीच्या अडचणीत वाढ, हसीन जहां प्रकरणात कोर्टाने दिला 'हा' आदेश title=

Mohammed Shami Hasin Jahan Case Update : एशिया कप स्पर्धेसाठी (Asia Cup 2023) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून वेगवान गोलंदाजीची मदार जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि मोहम्मद शमी (Mohammed Shami) यांच्यावर असणार आहे. यासाठी बुमराह आणि शमी दोघंही सज्ज झाले आहेत. पण स्पर्धेला अवघ्या काही दिवसांचा अवधी बाकी असताना मोहम्मद शमीच्या अडचणीत वाढ झाली आहे. शमी विरोधात पत्नी हसीन जहाँने (Hasin Jahan) तक्रार केली असून हे प्रकरण कोर्टात आहे. आता कोर्टाने (Court) याप्रकरणात महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. ज्यामुळे शमीला अडचणींना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. 

हसीन जहाँने मोहम्मद शमी आणि त्याचा भाऊ मोहम्मद हसीब विरोधात तक्रार दाखल केली आहे. आता याप्रकरणात पुढच्या 30 दिवसात शमीने अटकपूर्वण जामीन घ्यावा असे आदेश कोर्टाने दिले आहेत. एशिया कप स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर आहे. त्यानंतर लगेचच म्हणजे ऑक्टोबर महिन्यात एकदिवसीय विश्वचशक स्पर्धा खेळवली जाणार आहे. त्याआधी मोहम्मद शमीला कोर्टाकडून जामीन मंजूर करुन घ्यावा लागणार आहे. 

2011 मध्ये झाली होती भेट
मोहम्मद शमी आणि हसीन जहांचा प्रेम विवाह झाला. हसीन जहां मॉडेल आणि आयपीएलमध्ये चीअरलीडर होती. 2011 मध्ये शमी आणि हसीनची पहिल्यांदा भेट झाली. त्यावेळी हसीन जहां आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सची चिअरलीडर होती. सामन्यादरम्यान शमी आणि हसीनची ओळख झाली आणि ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी 2014 मध्ये लग्न केलं. लग्नानंतर हसीन जहांने मॉडलिंग आणि चीअरलीडरचं काम सोडलं.

10 लाख रुपयांची मागणी
मोहम्मद शमीबरोबर वाद झाल्यानंतर हसीन जहां आपल्य मुलीबरोबर वेगळी झाली. तीने पोटगी म्हणून महिना दहा लाख रुपयांची मागणी करणारी याचिका कोर्टात दाखल केली. यातले सात लाख रुपये स्वत:चा खर्च तर 3 लाख रुपये मुलीच्या पालनपोषणासाठी अशी मागणी तीने केली. हसीनचे वकिल मृगांका मिस्त्रीने कोर्टात केलेल्या दाव्यानुसार शमीची वार्षिक उत्पन्न 7 कोटी रुपये इतकं आहे. 

अशात दहा लाख रुपये महिना देणं शमीला जराही कठिण नाही असं हसीनच्या वकिलांनी सांगितलं. यावर शमीचे वकिल सेलिम रहमान यांनी हसीन जहां स्वत:ही कमवत असल्याचा यु्क्तीवाद केला. हसीन व्यावसायिक मॉडेल आहे, यातून तिला चांगलं उत्त्पन्न मिळतं, त्यामुळे दहा लाख रुपयांची मागणी जास्त असल्याचं शमीच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं. त्यानंतर कोर्टाने शमीला दरमहा दीड लाख रुपये हसीन जहाँला देण्याचा आदेश दिला होता.