ICC Test Rankings: इंदूर टेस्टदरम्यान टीम इंडियाच्या बॉलरला लॉटरी, ICC कसोटी क्रमवारीत नंबर 1

Latest ICC Test Ranking : आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊंसिलने (ICC) कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. यात भारताच्या रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) ने क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे.

Updated: Mar 1, 2023, 04:35 PM IST
ICC Test Rankings: इंदूर टेस्टदरम्यान टीम इंडियाच्या बॉलरला लॉटरी, ICC कसोटी क्रमवारीत नंबर 1 title=

Latest ICC Test Rankings: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (India vs Australia Test Series) इंदोरमध्ये तिसरा कसोटी सामना (Indore Test Match) खेळवला जात आहे. टॉस जिंकून भारताने (Team India) पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण ऑस्ट्रेलियन (Australia) फिरकी गोलंदाजांच्या जाळ्यात टीम इंडिया अडकली आणि अवघ्या 109 धावांवर पहिली इनिंग आटोपली. भारतातर्फे विराट कोहलीने (Virat Kohli) सर्वाधिक 22 धावा केल्या. याला उत्तर देताना ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केली. दरम्यान, इंदूर कसोटी सामन्यादरम्यान टीम इंडियासाठी एक चांगली बातमी आली आहे. आयसीसी कसोटी क्रमवारीत (ICC Test Ranking) टीम इंडियाचा गोलंदाजाने अव्वल स्थान पटकावलं आहे.

आर अश्विनने पटकावला बहुमान (ICC Bowler Test Ranking)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने गोलंदाजांची कसोटी क्रमवारी (ICC Test Rankings) जाहीर केली आहे. यात भारतीय गोलंदाजाने अव्वल स्थान पटकावंत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला (James Anderson) मागे टाकलं आहे. टीम इंडियाचा दिग्गज स्पीन गोलंदाज आर अश्विन जगातील नंबर वन गोलंदाज नबला आहे. 36 वर्षांच्या आर अश्विनच्या (R Ashwin) खात्यात 864 पॉईंट जमा झाले आहेत. तर जेम्स अँडरसनच्या खात्यात 859 पॉईंट्स आहेत. तर ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स 858 पॉईंट्सह तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

ऑलराऊंडच्या यादीतही झेप (ICC Allrounder Test Ranking)

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील (Border-Gavaskar Trophy) आधीच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये आर अश्विनने दमदार कामगिरी केली. उर्वरीत दोन कसोटीत कामगिरीत सातत्य ठेवत नंबर वन स्थान कायम ठेवण्याची संधी अश्विनकडे आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यात अश्विनने 13 विकेट घेतल्या आहेत. 37 धावांमध्ये 5 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. गोलंदाजी क्रमवारीबरोबरच अश्विन ऑलराऊंडर क्रमवारीतही दुसऱ्या क्रमांकावर आहे. गोलंदाजांच्या यादीत रवींद्र जडेजा आठव्या स्थानावर आहे. दिल्ली कोसटीत रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) 10 विकेट घेतल्या होत्या. तर भारताचा प्रमुख वेगावन गोलंदाज जसप्रीत बुमराह चौथ्या स्थानावर आहे. 

हे ही वाचा : प्रेम नको, सर्वांना फक्त SEX हवा होता, मग पैसे घेऊन का नको? 26 वर्षांचा जेरी बनला ट्रान्सजेंडर सेक्स वर्कर

अश्विनची क्रिकेट कारकिर्द (Ravichandran Ashwin Test Career)

आर अश्विन टीम इंडियाचा प्रमुख आणि अनुभवी स्पीन गोलंदाज आहे. आतापर्यंत भारतासाठी अश्विन 90 कसोटी सामने खेळला आहे. यात त्याने 463 विकेट घेतल्या आहेत. तर 113 एकदिवसीय सामन्यात 151 आणि 65 टी20 सामन्यात 72 विकेट घेतल्या आहेत.