IND vs AUS: दिल्ली कसोटीत विराट कोहलीचं अनोखं शतक, सचिन तेंडुलकरनंतर ठरला दुसरा खेळाडू

IND vs AUS 2nd Test: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळल्या जाणाऱ्या दुसऱअया कसोटी सामन्यात विराट कोहलीने मोठा विक्रम केला आहे, त्याने एमएस धोणी आणि राहुल द्रविडला मागे टाकलं आहे

Updated: Feb 18, 2023, 02:53 PM IST
IND vs AUS: दिल्ली कसोटीत विराट कोहलीचं अनोखं शतक, सचिन तेंडुलकरनंतर ठरला दुसरा खेळाडू title=

Virat Kohli IND vs AUS 2nd Test: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानचा दुसरा कसोटी सामना दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडिअमवर (Delhi Test) खेळला जातआहे. या सामन्यात फलंदाजीसाठी मैदानात पाऊल ठेवताच टीम इंडियाचा (Team India) स्टार फलंदाजी विराट कोहलीच्या (Virat Kohli)नावावर एक अनोखा विक्रम जमा झाला आहे. आतापर्यंत हा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) नावावर होता. विराट कोहलीने आता या विक्रमाशी बरोबरी केली आहे. 

विराटच्या नावावर अनोखं शतक
ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 इनिंग (100 Test Inning Against Australia) खेळणारा विराट कोहली दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. विराट कोहली आधी केवळ सचिन तेंडुलकर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 100 इनिंग खेळला आहे. विराट ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात 41 इनिंग तर टी20 सामन्यात 21 इनिंग खेळला आहे. 

सचिन तेंडुलकरच्या नावावर सर्वाधिक इनिंग
भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 144 इनिंगमध्ये फलंदाजी केली आहे. सचिनने 49.68 च्या रनरेटने 6707 धावा केल्या आहेत. यात 20 शतक आणि 31 अर्धशतकांचा समावेश आहे. तर विराट कोहलीने 100 इनिंगमध्ये 51 च्या रनरेटने 4500 धावा केल्या आहेत. 

दिल्ली टेस्टमध्ये विराटच्या विकेटवरुन वाद
दिल्ली कसोटीच्या पहिल्या इनिंगमध्ये विराट कोहली 44 धावा करुन बाद झाला. यासाठी त्याने 84 चेंडुंचा सामना केला आणि 4 चौकार लगावले. कुनह्रॅनच्या गोलंदाजीवर तो एलबीडब्ल्यू झाला. पण विराटच्या विकेटवरुन नवा वाद निर्माण झाला आहे. कुनह्नॅनच्या पहिला चेंडू विराटच्या पॅडवर आदळला. अंपायरने त्याला बाद दिल्यानंतर विराटने रिव्ह्यू घेतला. पण थर्ड अंपायरनेही बादचा निर्णय कायम ठेवला. व्हिडिओमध्ये चेंडू बॅटची कड लागून पॅडवर आदळल्याचं स्पष्ट दिसत आहे. 

याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर अंपायरच्या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.