VIDEO : हवेत उडाली बॅट, बाउंड्रीच्या बाहेर गेला बॉल... कुंफू पंड्याचा शॉट पाहून फिल्डरही चकित

IND VS BAN T20 1st Match Hardik Pandya Shots :  टीम इंडियाच्या विजयासाठी हार्दिक पंड्याने 39 धावांची धमाकेदार केली. यावेळी त्याने मारलेला शॉट पाहून फिल्डरही चकित आले.  

पुजा पवार | Updated: Oct 7, 2024, 12:50 PM IST
VIDEO : हवेत उडाली बॅट, बाउंड्रीच्या बाहेर गेला बॉल...  कुंफू पंड्याचा शॉट पाहून फिल्डरही चकित title=
(Photo Credit : Social Media)

IND VS BAN T20 1st Match : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांची टी 20 सीरिज खेळवली जात असून यातील पहिला सामना ग्वालियार येथील नव्या क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात सुरुवातीला अर्शदीप सिंह आणि वरुण चक्रवर्तीकच्या गोलंदाजी समोर बांगलादेशच्या टीमने गुडघे टेकले आणि 127 वर ऑल आउट झाले. तर टीम इंडियाच्या विजयासाठी हार्दिक पंड्याने 39 धावांची धमाकेदार केली. यावेळी त्याने मारलेला शॉट पाहून फिल्डरही चकित आले.  

हार्दिकने हवेत बॅट फेकून मारला चौकार : 

हार्दिक पंड्याने या सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी केली. त्याने केवळ 16 बॉलमध्ये 39 धावांची खेळी केली. यावेळी त्याने 5 चौकार आणि 2 षटकार लगावले. हार्दिक यावेळी त्याच्या पूर्ण फॉर्मात बॅटिंग करत होता. यावेळी 12 व्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर वेगवान गोलंदाज तस्कीन अहमदने हार्दिकला फुलटॉस बॉल टाकला होता. या बॉलवर शॉट खेळताना हार्दिकच्या हातून बॅट सटकली आणि बॅट हवेत उडाली तर बॉल बॅटला लागून चौकार मिळण्याच्या दिशेने बाउंड्रीच्या बाहेर गेला. 

पाहा व्हिडिओ : 

फिल्डर बॅटकडेच पाहत राहिला : 

शॉट मारताना हार्दिक पंड्याच्या हातून बॅट सटकली आणि हवेत उडाली. यावेळी बॅट स्क्वायर लेग अंपायर जवळ जाऊन पडली. तर बॉल बॅटला लागल्यावर बैकवर्ड पॉइंटच्या इथे गेली. इथे मेहदी हसन मिराज फील्डिंग करत होता. पण त्याचं लक्ष हे बॉल पेक्षा बॅटकडे जास्त होतं. तो पर्यंत तो बॉल रोखण्यासाठी रिएक्ट करेल तटाच्या आधी बॉल बाउंड्री लाइन बाहेर गेला होता. त्यानंतर पुढच्या बॉलवर हार्दिकने पुन्हा सिक्स सामना जिंकवून दिला. 

हेही वाचा : 'कोहलीने टीममध्ये आग लावली', विराट विषयी असं का म्हणाला हरभजन सिंह?

 

सामन्यात काय काय झालं? 

टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे बांगलादेशला प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरावे लागले.  अर्शदीप सिंह आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 3 विकेट्स आणि हार्दिक, मयंक आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी 1 विकेट घेऊन बांगलादेशला 127 वर ऑल आउट केले. टीम इंडियाला विजयासाठी 128 धावांचे आव्हान मिळाले, यावेळी हार्दिक पंड्या (39) , संजू सॅमसन (29) आणि कर्णधार सूर्यकुमार यादव (29) धावांची खेळी केली. तर अभिषेक शर्मा आणि नितेश रेड्डी या दोघांनी प्रत्येकी 16 धावांची कामगिरी केली.  टीम इंडियाने विजयासाठी मिळालेले 128 धावांचे आव्हान अवघ्या 11.5 ओव्हरमध्ये पूर्ण केले.