Who is Sachin Dha India's U-19 WC star : कर्णधार उदय सहारनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली आहे. सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने यजमान दक्षिण आफ्रिकेचा (India Beat South Africa) 2 विकेटने पराभव केला. दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदा फलंदाजी करत टीम इंडियासमोर 245 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान टीम इंडियाने सात विकेट गमावत पूर्ण केलं. टीम इंडियाचा कर्णधार उदय सहारनने (Uday Saharan) 84 धावांची खेळी केली. तर टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला युवा फलंदाज सचिन धस (Sachin Dhas), सचिनने 96 धावांची खेळी करत टीम इंडियाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
विजयी आव्हानाचा सामना करताना टीम इंडियाने 32 धावात चार विकेट गमावतले होते. पण उदय आणि सचिनने दक्षिण आफ्रिकेच्या हातातून विजय खेचून आणला. सचिन धसने याआधी नेपाळविरुद्धच्या सामन्यात 117 धावांची शानदार खेळी केली होती. उदय-सचिन जोडीने नेपाळविरुद्ध 200 धावांची विक्रमी भागिदारी केली होती. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध या जोडीने 187 धावात 171 धावांची भागिदारी केली होती.
कोण आहे सचिन धस?
सचिन धस हा महाराष्ट्रातल्या बीडचा राहाणारा आहे. पुण्यातल्या एका आमंत्रिताच्या अंडर-19 स्पर्धेत सचिन धसने षटकारांचा पाऊस पाडला. सचिनची फलंदाजी पाहून आयोजकही हैराण झाले होते. त्यांनी सचिनच्या बॅटची तपासणी केली.
तेंडुलकरच्या नावावर ठेवलं सचिन नाव
सचिनचे वडील संजय धस यांनी त्याचं नाव भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या नावावरुन ठेवलं. सुनील गावसकर आणि सचिन तेंडुलकर हे त्यांचे आवडते क्रिकेटपटू. संजय धस हे स्वत: क्रिकेटपटू होते. ते युनिव्हर्सिटी स्तरावर क्रिकेट खेळले आहेत. मुलाला क्रिकेटर बनवण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं.
पैसे उधार घेऊन मुलासाठी टर्प बनवला
सचिनला मोठा क्रिकेटपटू बनवण्यासाठी संजय स यांनी उधारीवर पैसे घेत टर्फ बनवली होती. जेणेकरुन सचिनला जास्तीतजास्त क्रिकेटचा सराव करता यावा. पण बीडमध्ये पाणी संकट असल्याने टर्फ ताजंतवाणं ठेवण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर होतं. यासाठी दर दोन दिवसांनी ते पाण्याचा टॅँकरही मागवत. पण सचिनच्या यशाचं श्रेय ते प्रशिक्षक अझहर यांना देतात. अझहर यांनी सचिनवर कठोर मेहनत घेतली.
अंडर19 स्पर्धेत सर्वाधिक धावा
अंडर-19 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये सचिन धससा समावेश आहे. त्याने आतापर्यंत सहा सामन्यात 294 धावा केल्या आहेत. पहिल्या क्रमांकावर टीम इंडियाचा कर्णधार उदय सहरान आहे. उदयने 6 सामन्यात 389 धावा केल्या आहेत. तर नबंर दोनवर भारताचाच मुशीर खआन आहे. मुशीरने 6 सामन्यात 338 धावा केल्यात.
सचिनची आई महाराष्ट्र पोलिसात
सचिन धसची आई सुरेखा घस या महाराष्ट्र पोलिसात असिस्टेंट इन्स्पेक्टर पदावर कार्यरत आहेत. त्यासुद्धा कबड्डी खेळाडू होत्या.