हा Video नाही पाहिलात तर काय पाहिलंत? अक्षर पटेलचा जादूई चेंडू, इंग्लंड हैराण..

Axar Patel Magic Ball Video : हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर भारतीत फिरकीपटूचा जलवा पाहिला मिळाला. भारतीय फिरकीसमोर इंग्लंडच्या बॅझबोल रणनितीची हवाच निघाली. या सामन्यात अक्षर पटेलने टाकलेल्या एका चेंडूची चोरदार चर्चा सुरु आहे.

राजीव कासले | Updated: Jan 25, 2024, 05:56 PM IST
हा Video नाही पाहिलात तर काय पाहिलंत? अक्षर पटेलचा जादूई चेंडू, इंग्लंड हैराण..  title=

Axar Patel Magic Ball Video : हैदराबाद कसोटीच्या पहिल्याच दिवशी टीम इंडियाने इंग्लंडची बॅझबॉल रणनिती (Bazball) त्यांच्यावरच उलटवली. गेल्या काही कसोटी सामन्यात इंग्लंडने बॅझबॉल रणनितीच्या जोरावर दमदार कामगिरी केलीय. पण भारतात त्यांच्या या रणनितीचा काही उपयोग झाला नाही. भारताच्या फिरकीसमोर इंग्लंडचा पहिला डाव 246 धावांवर आटोपला.  हैदराबादच्या खेळपट्टीवर भारतीय फिरकीपटूंनी कमाल केली. आर अश्विन, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल या फिरकी त्रिकुटासमोर इंग्लंडचे फलंदाज अक्षरश: हतबल झाले होते. 

अक्षरच्या जादूई चेंडूची चर्चा
आर अश्विन (R Ashwin) आणि रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. तर अक्षर पटेलने (Axar Patel) दोन विकेट घेतल्या. पण यातही अक्षर पटेलने टाकलेल्या एका चेंडूची क्रिकेट विश्वात जोरदार चर्चा रंगलीय. पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात अक्षर पटेलने एक चेंडू टाकला तो एका जादूपेक्षाही कमी नव्हता.

आला कुठून गेला कुठे
 इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरस्टो खेळपट्टीवर होता. बेन स्टोक आणि बेअरस्टोची जोडी मैदानावर जमली होती. पण सामन्याच्या 33 व्या षटकात अक्षर पटेलने कमाल केली. अक्षरने टाकलेल्या एका चेंडूवर जॉन बेअरस्टो पूरता चकला. अक्षर पटेलने टाकलेला हा चेंडू खेळण्यासाठी बेअरस्टोने बॅट उचलली पण फटका मारण्याच्या आतच चेंडूने टर्न घेतला आणि तेट स्टम्पवर जाऊन आदळला. काय घडतंय हे विचार करायला सुद्धा बेअरस्टोला वेळ मिळाला नाही. ज्या पद्धतीने अक्षर पटेलाचा चेंडू वळला त्याला ड्रीम बॉल म्हटलं जातं. अक्षर पटेलच्या गोलंदाजीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

अक्षरच्या गोलंदाजीने इंग्लंड हैराण
अक्षरने ज्या पद्धतीने बेअरस्टोला क्लीन बोल्ड केलं, ते पाहून इंग्लंड क्रिकेटमध्ये खळबळ उडाली. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पिटरसनने हा चेंडू पाहून आपण हैराण झाल्याचं म्हटलं. सामन्याच्या सुरुवातीला पिटरसनने इंग्लंड पहिल्या डावात 450 धावा करेल असा अंदाज व्यक्त केला होता. पण अक्षरची गोलंदाजी पाहून त्याने आपला शब्द मागे घेत असल्याचं सांगितलं. 

बॅझबॉल रणनिती इंग्लंडवरच उलटली
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी इंग्लंडने बॅझबॉल रणनितीची घोषणा केली होती. बॅझबॉल रणनिती म्हणजे कसोटी क्रिकेटमध्येही वेगाने धावा करणं. पण त्यांची ही रणनिती त्यांच्यावरच उलटली. भारताच्या रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालने पहिल्या षटकापासूनच आक्रमक फलंदाजी केली. अवध्या तेवीस षटकात टीम इंडियाने एक विकेट गमावत 119 धावा केल्या. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालया सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी 80 धावांची भागिदारी केली. रोहित शर्मा 24 धावांवर बाद झाला. पण यशस्वी जयस्वलाने इंग्लंडच्या गोलंदाजांती पिसं काढली. जयस्वालने अवघ्या  70 चेंडूत नाबाद 76 धावा केल्या. यात त्याने 3 षटकार आणि तब्बल 9 चौकार लगावले.