Team India Number 1 Test Team: आयसीसीने कसोटी क्रिकेटची क्रमवारी (ICC Test Ranking) जाहीर केली असून भारतीय क्रिकेट संघाने अव्वल स्थान पटकावलं आहे. रोहित शर्माच्या (Rohit Pawar) नेतृत्वाख खेळणाऱ्या टीम इंडियाने (Team India) ऑस्ट्रेलियाच्या (Australia) वर्चस्वाला धक्का दिला आहे. गेल्या पंधरा महिन्यांपासून ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर कायम होती. नव्या क्रमावारीमुळे टीम इंडिया पुढच्या महिन्यात होणाऱ्या आयसीसीच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन (ICC World Test Championship) स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या एक पाऊल पुढे गेली आहे.
टी20 तर नंबर वन
टी20 आयसीसी क्रमवारीतही (ICC T20 Ranking) टीम इंडियाचा दबदबा कायम आहे. टी20 क्रमवारीत भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर असून इंग्लंड क्रिकेट संघ दुसऱ्या स्थानावर आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये मात्र टीम इंडिया तिसऱ्या स्थानावर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 7 जूनपासून खेळवण्यात येणार आहे.
कसोटी टीम इंडिया अव्वल
कसोटी क्रमवारी ऑस्ट्रेलियाचा संघ 122 पॉईंट्सह पहिल्या क्रमांकावर होता. तर टीम इंडियाच्या खात्यात 119 पॉईंट होते. आता टीम इंडिया 121 पॉईंटसह पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. तर ऑस्ट्रेलिया संघ 116 पॉईंट्ससह दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. तिसऱ्या स्थानावर इंग्लंडचा संघ असून त्यांच्या खात्यात 114 पॉईंट आहेत. चौथ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका आणि पाचव्या क्रमांकावर न्यूझीलंडचा संघ आहे. ताज्या क्रमावारीत पाकिस्तानचा संघ सहाव्या स्थानावर आहे. याशिवाय श्रीलंका सातव्या, वेस्टइंडिज आठव्या, बांगलादेश नवव्या तर झिम्बाब्वे दहाव्या क्रमांकावर आहे.
टी20त भारताचं वर्चस्व
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही भारत अव्वल स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर इंग्लंड आणि तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा संघ आहे. पाकिस्तानचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे. या यादीत ऑस्ट्रेलियात सहाव्या आणि वेस्ट इंडिज सातव्या स्थानावर आहे. आठव्य आणि नवव्या क्रमांकावर श्रीलंका आणि बांगलादेश आहे. तर अफगानिस्तान दहाव्या स्थानावर आहे.
वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघ
आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेली टीम इंडिया आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रंगणार आहे. 7 जूनपासून इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी बीसीसीआयने 15 खेळाडूंच्या भारतीय संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ऑस्ट्रेलियाशी दोन हात करणार आहे.
वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (विकेटकिपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट