IPLसुरु असतानाच कोहलीला सोडावी लागू शकते कॅप्टन्सी?

आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यादरम्यान कोहलीला स्पर्धेच्या मध्यातच कर्णधारपदावरून काढून टाकण्याची शक्यता आहे.

Updated: Sep 22, 2021, 02:05 PM IST
IPLसुरु असतानाच कोहलीला सोडावी लागू शकते कॅप्टन्सी? title=

दिल्ली : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीबद्दल एक मोठी बातमी समोर आलीये. युएईमध्ये सध्या सुरू असलेल्या आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यादरम्यान कोहलीला स्पर्धेच्या मध्यातच कर्णधारपदावरून काढून टाकण्याची शक्यता आहे. नुकतंच, कोहलीने घोषणा केली होती की या आयपीएल 2021 हंगामानंतर तो आरसीबीचे कर्णधारपद सोडणार आहे. कोहलीच्या या निर्णयानंतर त्याच्यावर जोरदार टीका करण्यात आल्या.

कोहलीला आरसीबीच्या कर्णधारपदावरून काढता येऊ शकतं का?

दिग्गजांच्या मताप्रमाणे, मधल्या आयपीएल स्पर्धेत कोहलीने कर्णधारपद सोडण्याची घोषणा केल्याने आरसीबी संघाच्या कामगिरीवर परिणाम होईल. हे देखील खरं असल्याचं सिद्ध झालं. सोमवारी झालेल्या आयपीएल सामन्यात बेंगळुरू संघाने कोलकाताविरुद्ध लाजिरवाणी कामगिरी केली. बंगळुरूचा संघ अवघ्या 92 धावांवर बाद झाला आणि कोलकात्याने 10 ओव्हर्स शिल्लक असताना 9 विकेट्स राखून सहज विजय मिळवला.

यामुळे कोहलीच्या कर्णधारपदावर टांगती तलवार 

क्रिकेट नेक्स्टमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, काही क्रिकेटपटूंनी कोहलीच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याच्या अकाली घोषणेनंतर आरसीबी संघ शांत नसल्याचं दिसत असल्याचं सूचित केलंय. 

एका माजी भारतीय क्रिकेटपटूच्या सांगण्याप्रमाणे, असं दिसतंय की आरसीबीच्या कर्णधारपदावरून कोहलीला मध्यभागी सोडावं लागू शकतं. तो कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध कसा खेळत होता. असं दिसतंय की तो सध्या खूप संघर्ष करतोय. त्याला हंगामाच्या मध्यात काढलं जाण्याची शक्यता आहे.

यापूर्वी IPL मध्ये असं घडलं आहे!

माजी भारतीय क्रिकेटपटू म्हणाला, 'यापूर्वीही इतर संघांसोबत असं घडलं आहे. केकेआर मधील दिनेश कार्तिक आणि सनरायझर्स हैदराबाद मधील डेव्हिड वॉर्नर हे दोघं उदाहरणं आहेत. त्यांना एकतर काढून टाकण्यात आलं किंवा ते स्वत:हून बाहेर पडले. त्यामुळे असं RCB मध्येही होऊ शकतं. केकेआर आणि आरसीबीचा सामना पाहिल्यानंतर मला असं वाटतंय. आणखी एक वाईट खेळ आणि तुम्ही लगेच आरसीबीच्या कर्णधारपदामध्ये बदल झालेला पाहू शकता.