मुंबई : कोरोनाविरोधात लढण्यासाठी सर्वच स्तरावरून आर्थिक मदत करायला लोकं पुढे सरसावले आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने कोरोनाग्रस्तांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या PM Cares मार्फत मदतीचा हात पुढे केला. सर्वच स्तरावरून मदतीचा ओघ येत आहे यामध्ये कलाकार, उद्योगपती सगळ्यांचाच समावेश आहे.
यामध्ये आता १५ वर्षांच्या इशा सिंह या शूटरचा समावेश झाला आहे. इशाने आपल्या आतापर्यंतच्या सेव्हिंगमधून ३० हजार रुपयांची मदत दिली आहे. ३०हजार ही रक्कम आतापर्यंत आलेल्या मदतीमध्ये कमी असेल. पण १५ वर्षांच्या इशाचं मन मोठं असल्याचं दिसून येतं. यानंतर तिचं सोशल मीडियावर कौतुक होत असून तिला नेटिझन्स कडक सल्यूट करत आहेत.
Dear @singhesha10 , you are just 15 years old but you have shown that you are a real champion! What a beautiful gesture by such generous contribution to #PMCARES Fund https://t.co/DgruCHxGV4
— Kiren Rijiju (@KirenRijiju) March 29, 2020
इशाने या मदतीसंदर्भात सोशल मीडियावर ट्विट केलं आहे. महत्वाचं म्हणजे तिचं ट्विट केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांनी रिट्विट करून इशाचं कौतुक केलं आहे. त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलंय की, तू अवघ्या १५ वर्षांची असूनही खरी चॅम्पियन आहेस.
आतापर्यंत अनेकजणांनी पुढे येऊन कोरोनाशी लढण्यासाठी मदत जाहीर केली आहे. टीम इंडियाचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायता निधीला १० लाख रुपयांची मदत केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी कोरोनाचा सामना करण्यासाठी पीएम केयर्स फंडाला मदत करा, असं आवाहन केलं होतं. रहाणेने केलेली ही मदत कोरोनाशी लढताना गरजूंना अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी वापरली जाणार आहे. अजिंक्य रहाणेनेही आपण मुख्यमंत्री सहायता निधीला मदत केल्याला दुजोरा दिला आहे. विक्रम साठ्ये यांनी केलेल्या ट्विटला रहाणेने उत्तर दिलं.