मुंबई: कोरोना व्हायरसच्या दुसर्या लाटेचा भारतावर सध्या परिणाम झाला आहे. देशातील कोट्यवधी लोकांना या साथीच्या आजाराची लागण होत आहे. या व्यतिरिक्त हजारो लोक आपले जीव गमावत आहेत. भारतीय संघातील काही खेळाडू सतत त्यांच्या पातळीवर लोकांना मदत करत आहेत.
भारताचा स्टार खेळाडू हनुमा विहारीने मध्यरात्री एक व्यक्तीला मदत करून जीव वाचवला आहे. हनुमा साध्य ट्वीटरवर खूप अॅक्टिव आहे. आपल्या परिने जेवढं शक्य होतं तेवढ्या लोकांना मदत करत आहे. मध्यरात्री एका व्यक्तीला हनुमाने मदत केली आहे.त्याचा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Thankyou hanu vihari garu..
Golden heart.. responded in midnight too.- and thanks to @Arshad_shannu
will pray for her speedy recovery https://t.co/apGZ5TwdJo pic.twitter.com/qLoaS9sdwu— — 「 (@Hidderkaran) May 13, 2021
Hope he recovers soon https://t.co/9eQI0Jzy4e
— Hanuma vihari (@Hanumavihari) May 13, 2021
या स्क्रीनशॉटमध्ये युझरने असं लिहिलं आहे की अण्णा धन्यवाद, तुम्ही आज जीव वाचवला आहे. हा स्क्रीनशॉट शेअर करताना त्या युझरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'धन्यवाद हनुमा गारु. अगदी मध्यरात्रीही आपण मदत करत आहात.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार हनुमा यांनी ज्यांना खरंच गरज आहे अशा लोकांना ग्राऊंड लेव्हलवर मदत करणार असल्याचं सांगितलं आहे. माझ्याकडून ज्यांना खऱ्या अर्थानं मदतीची गरज आहे अशांना करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. यावरून काही युझर्सनी त्यांना ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र विहारीने त्यांनी चोख प्रत्युत्तर देखील सोशल मीडियावर दिलं होतं.