Abu Dhabi T10 League 2022: अबु धाबीमध्ये (Abu Dhabi) खेळल्या जाणाऱ्या टी-20 लीगमध्ये दरदिवशी रंजक सामने पहायला मिळतायत. अशातच शनिवारी अबु धाबी आणि डेक्कन ग्लॅडिएटर्समध्ये (Deccan Gladiators)सामना खेळला गेला. या दोन्ही टीम्समध्ये एलिमिनेटर सामना खेळवण्यात आला. ज्यामध्ये डेक्कन ग्लॅडिएटर्सने अबु धाबीला 5 रन्सने हरवलं. मात्र या सामन्यात सर्वात चर्चेचा विषय ठरला तो क्रिस लिन (Chris Lynn) आणि एलेक्स हेल्स (Alex Hales) यांचं एक कृत्य.
अबु धाबीची टीम हा सामना हरली खरी, मात्र त्यांचे ओपनर्स क्रिस लिन आणि एलेक्स हेल्स चर्चेचा विषय ठरले. सध्या सोशल मिडियावर त्यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.
सामन्यात दरम्यान डेक्कन ग्लॅडिएटर्सने पहिल्यांदा फलंदाजी करत 10 ओव्हरमध्ये 94 रन्स केले. 95 रन्सचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी क्रिस लिन आणि एलेक्स हेल्स मैदाावर उतरले होते. मात्र दोन्ही फलंदाजांपैकी ओपनिंग कोण करणार हे ठरत नव्हतं. अखेर त्यांनी मैदानात उतरून स्टोन, पेपर, सीझर (rock-paper-scissors) हा गेम खेळून जिंकेल तो ओपनिंग करणार असं ठरवलं.
हेल्स आणि लिन यांच्या जोडीने, स्टोन, पेपर आणि सिझन हा गेम खेळला. हा गेम खेळून झाल्यानंतर त्यांनी ठरवलं की कोण स्ट्राईक घेणार आणि कोण नॉन स्ट्रायकर राहणार. दरम्यान या दोघांचं कृत्य पाहून मैदानात बसलेला प्रत्येक व्यक्ती हसू लागला.
— Hassam (@Nasha_e_cricket) December 3, 2022
या दोघांचाही व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात शेअर करण्यात आलाय. ज्यानंतर ख्रिस लिनने पहिला बॉल खेळला आणि स्ट्राईक रोटेट केली. ज्यानंतर हेल्स त्याच ओव्हरमध्ये आऊट झाला. या सामन्यात ख्रिस लिनने 5 बॉल्समध्ये 13 रन्स आणि हेल्सने 3 बॉल्समध्ये 1 रन केला.
भले या दोन्ही खेळाडूंची टीम हा सामना हरली. मात्र त्याच्या या कृत्याने सर्वांची मनं जिंकली आहेत.