Chetan Sharma Sting Operation: रोहित शर्माची T-20 कॅप्टन्सी जाणार, चेतन शर्मा यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट!

Chetan Sharma Sting Operation : रोहित शर्माला आराम देण्याच्या बहाण्याने त्याचा टी 20 मधून पत्ता कट करण्यात येईल, असं वक्तव्य चेतन शर्मा यांनी केलं आहे.

Updated: Feb 15, 2023, 03:14 PM IST
Chetan Sharma Sting Operation: रोहित शर्माची T-20 कॅप्टन्सी जाणार, चेतन शर्मा यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट! title=
Chetan Sharma rohit sharma

Chetan Sharma Sting Operation: झी मीडियाने केलेल्या स्टिंग ऑपरेशनने भारतीय क्रिकेटमधील खळबळजनक सत्य समोर (Chetan Sharma Sting Operation) आलं आहे. भारतीय क्रिकेटमध्ये (Team India) सुरू असलेला खेळखंडोबा झी मीडियाने (Zee Media) समोर आणलाय आणि यानंतर बीसीसीआयसुद्धा खडबडून जागी झालीय. टीम इंडियाच्या निवड समितीचे चेअरमन चेतन शर्मा (BCCI Selector Chetan Sharma) यांनी खळबळजनक खुलासे केल्यानंतर आता क्रिडाविश्वात संताप व्यक्त केला जातोय. (Chetan Sharma Sting Operation biggest revelation about Rohit Sharma T20 captaincy exclusive sports news)

चेतन शर्मा (Chetan Sharma)  यांनी भारतीय संघात इंजेक्शन खेळ सुरू असल्याचं म्हटलं आहे. इंजेक्शनच्या मदतीने टीम इंडियाचे अनफिट खेळाडू देखील फिट होत आहेत, असा खळबळजनक खुलासा चेतन शर्मा यांनी केलाय. त्यावेळी त्यांनी गांगुली विराट वाद (Ganguly Virat controversy) त्याचबरोबर बुमराहच्या फिटनेसविषय़ी (Bumrah's fitness) देखील भाष्य केलंय. त्याचबरोबर रोहितच्या  T-20 कॅप्टन्सीबाबत चेतन शर्मा यांनी सर्वात मोठा गौप्यस्फोट देखील केलाय.

काय म्हणाले चेतन शर्मा?

रोहित शर्माला आराम देण्याच्या बहाण्याने त्याचा टी-20 मधून पत्ता कट करण्यात येईल, असं वक्तव्य चेतन शर्मा यांनी केलं आहे. टी-ट्वेंटीमध्ये शुभमन आणि इतर खेळाडूंना संधी मिळावी, म्हणून रोहित विराटला विश्रांती दिली जात आहे. हार्दिक हा दिर्घकाळ टीम इंडियाची धुरा सांभाळेल. त्यामुळे रोहित यापुढे टी-20 संघात दिसणार नाही, असं चेतन शर्मा म्हणाले आहेत.

आणखी वाचा - Chetan Sharma Sting Operation: टीम इंडियामध्ये 'इंजेक्शन खेळ'... चेतन शर्मा यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट!

विराट- रोहितमध्ये वाद?

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात कोणताही वाद नाही किंवा भांडण नाही. फक्त दोघांचा अहंकार आडवा येतोय. ते दोघंही फिल्म स्टार सारखे आहेत. अमिताभ आणि धर्मेंद्र सारखे, असंही चेतन शर्मा यांनी स्टिंग ऑपरेशनमध्ये म्हटलं आहे.

बुमराहवर खळबळजनक खुलासा

आम्ही बुमराहला पाकिस्तानविरुद्ध खेळवलं असतं. मात्र, त्याला जर खेळवलं असतं आणि त्याला काही सामन्यामध्ये झालं असतं. तर आम्ही तोंड दाखवण्याच्या लायकीचे राहिलो नसतो, असंही चेतन शर्मा म्हणतात. त्यावेळी त्याला का खेळवण्यात आलं होतं? असा सवाल देखील उपस्थित केलाय.