विराट भारी की रोहित नंबरी...कोण आहे टॉपचा खेळाडू?

 श्रीलंकेविरूद्धच्या सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान टेस्ट टीमच्या कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माकडे देण्यात आली आहे.

Updated: Feb 20, 2022, 02:41 PM IST
विराट भारी की रोहित नंबरी...कोण आहे टॉपचा खेळाडू? title=

मुंबई : श्रीलंकेविरूद्धच्या सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान टेस्ट टीमच्या कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माकडे देण्यात आली आहे. दरम्यान भारतीय क्रिकेट टीमचे मुख्य सिलेक्टर चेतन शर्मा यांनी एक मोठं विधान केलं आहे. तिन्ही फॉर्मेटचा कर्णधार रोहित शर्माचं कौतुक करत देशाचा नंबर 1 खेळाडू असल्याचं म्हटलंय.

चेतन शर्मा वर्चुअल प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये म्हणाले की, "कर्णधारपदासाठी रोहितच्या नावाला प्रत्येकाची पसंती होती. तो देशातील नंबर 1 खेळाडू आहे आणि तो तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळणार ही मोठी गोष्ट आहे. रोहित कर्णधारपदी असताना इतर खेळाडूंना कर्णधारपदासाठी तयार करण्यात येईल."

रोहित 35 वा कर्णधार

वर्ल्डक्रिकेटमध्ये हिटमॅनच्या नावाने फेमस असलेला रोहित भारताचा 35वा कर्णधार आहे. यापूर्वीच त्याला टी-20 आणि वनडेचं कर्णधारपदंही देण्यात आलं होतं. 

वेस्ट इंडिजला टी-20 सिरीजमध्ये क्लीन स्विप देण्यासाठी टीम इंडिया आज मैदानात उतरणार आहे. या सिरीजची आज तिसरी आणि शेवटीची टी-20 मॅच रंगणार आहे. गेल्या सामन्यात झालेल्या चुका टाळण्याचा पूर्ण प्रयत्न रोहित करणार असून काही बदल यावेळी टीममध्ये करण्यात येणार आहेत. 

तिसऱ्या टी-20 सामन्यातून विराट कोहली आणि ऋषभ पंत यांना आराम देण्यात आला आहे. त्यामुळे यावेळी टीममध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. त्यातच सिरीज जिंकल्यामुळे रोहित शर्मा युवा खेळाडूंना संधी देऊ शकतो.