Chennai Super Kings, IPL 2023 Final: पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा (CSK Beat GT) पराभव करून थाटात फायनलमध्ये (IPL 2023 Final) एन्ट्री मारली आहे. सीएसकेने गुजरातचा 15 धावांनी पराभव केला. त्याचबरोबर चेन्नईला 10 व्यांदा आयपीएल फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. आता गुजरातचा सामना हा एलिमिनेटरच्या विजेत्या संघासह होईल. (Chennai Super Kings win by 15 runs Beat Gujarat Titans in Qualifier 1 IPL 2023)
गुजरातच्या अखेरच्या षटकात 27 धावांची गरज होती. राशिद बाद झाल्याने गुजरातच्या विजयाच्या आशा मावळल्या होत्या. 19 व्या ओव्हरमध्ये गुजरातचा टांगा पलटी झाला. तुषार देशपांडे (Tushar Deshpande) यांच्या अचूक माऱ्यावर शॉट खेळताना आक्रमक अंदाजात खेळत असलेला राशिद खान (Rashid khan) बाद झाला. त्याने 16 बॉलमध्ये 30 धावा करत खिंड लढवली होती. मात्र, देशपांडेने चेन्नईच्या विजयातील काटा दूर केला आणि फक्त 8 धावा देत चेन्नईला पुन्हा सामन्यात आणलं.
Join the Chennai Super Kings as they celebrate a spectacular win and become the first finalists of #TATAIPL 2023 #TATAIPL | #Qualifier1 | #GTvCSK | @ChennaiIPL pic.twitter.com/ZLPIY2gEEu
— IndianPremierLeague (@IPL) May 23, 2023
पहिल्या डावात चेन्नई सुपर किंग्जने 20 ओव्हरमध्ये 172 धावा केल्या आहेत. आता गुजरात टायटन्स विजयासाठी 173 धावांची गरज होती. महत्त्वाच्या सामन्यात फक्त 36 बॉलमध्ये ऋतुराज गायकवाडची फिफ्टी झळकावली. त्यानंतर चेन्नईचा फलंदाजी ठासळल्याचं दिसून आलं. अखेरच्या ओव्हरमध्ये जडेजाने धुंवाधार फटकेबाजी केली आणि चेन्नईला 172 वर पोहोचवलं.
Super sday in #Yellove! #GTvCSK #WhistlePodu pic.twitter.com/WHkDdSoEmn
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 23, 2023
आणखी वाचा - MS Dhoni च्या निवृत्तीवर CSK च्या सीईओचं मोठं वक्तव्य, पाहा काय म्हणाले...